पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आजही ज्यांच्या नोटेशन्स वापरून विद्यार्थी शास्त्रीय गायन शिकतात ते संगीत पंडीत विष्णु दिंगबर पलुसकर हे महाराजांनी भरविलेल्या पहिल्या संगीत परिषदेत हजर होते. परंतू या परिषदेत इंग्रजी भाषेचा केलेला अधिक वापर पलूसकरांना आवडला नाही. त्यांच्या मताप्रमाणे परिषद सर्वांना समजेल अशा भाषेत व्हायला हवी होती. त्यामुळे ते तिथे रमले नाहीत असे संदर्भ सापडतात. परंतू महाराजांनी पं. पलुसकर व पं. भातखंडेना कलाभवनच्या संगीत विभागाच्या औपचारीक तपासणीसाठी (inspection) बोलावले होते. दोघेही तेव्हा बडोद्यात येऊन तपासणी करून गेले होते. अशा पंडित पलुसकरांसंदर्भातील नोंदी पहिल्या संगीत परिषदेच्या अहवालात सापडतात.
उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि अब्दुल हक्क बडोद्यात, १८९४
 उस्ताद अब्दुल करीम खाँ हे असे गवई होऊन गेले की, ज्यांच्या नावाचा उच्चार हीच संगीत शौकिनांमध्ये एक जादू मानली जात असे. त्यांच्या उमेदीच्या काळात सयाजीरावांनी त्यांना राजाश्रय दिला. पुढे त्यांना ‘बडोदा दरबार गवई' हे स्थान प्राप्त झाले. बडोद्याच्या वास्तव्यात खाँसाहेबांनी महाराजांवर आपल्या गायनकलेचा चांगला प्रभाव पाडला होता.

 अब्दुल करीम खाँ आणि अब्दुल हक्क खाँ हे दोघे बंधू भावनगरहून बडोद्यास आले. या दोघा बंधूंचे संगीताप्रति श्रध्दा जाणून महाराजांनी त्यांना दरबारात नोकरी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १५