या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ग्रंथमालेतून निरनिराळ्या शास्त्रांवरील ग्रंथ तयार करण्यात आले. १८९३ ला सरकारमार्फत विद्वान लोकांना नोकरीत ठेऊन त्यांच्याकडून ग्रंथ लिहून घेण्याची व्यवस्था करण्यात आली.
उस्ताद मौलाबक्ष खाँ आणि उस्ताद फैजमहंमद खाँ बडोद्यात, १८८६
इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची १८८९ मध्ये सयाजीरावांचे खाजगी चिटणीस म्हणून नेमणूक झाली. त्यांना बडोद्याच्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कार्यकर्त्यांची बारकाईने पहाणी करून त्यांचा वृत्तांत महाराजांसमोर सादर करावे लागे. एकदा बडोद्याचे दोन गवई महाराजांना भेटायला आले. एकाचे नाव मौलाबक्ष व दुसऱ्याचे फैजमहंमद. दोघांच्या गायन शाळा होत्या. त्यासाठी जागा,
महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १०