पान:महाबळेश्वर.djvu/252

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१७ )

 प्राण्यांचे जे तीन वर्ग ( १) केवळ मांसाहारी (२) केवळ धान्याहारी व (३) मांसधान्याहारी त्यांच्या निरनिराळ्या आहारांवरून केले आहेत,त्यांपैकीं कोणत्याही वर्गातील प्राण्यांस आपलें भक्ष्य “गोपाल" वृत्तीचें, किंवा कृषीवलवृत्तीचें अवलंबन करून संपादितां येत नाहीं. अशा रीतीनें आपला चरितार्थ करण्याची बुद्धि व सामर्थ्य फक्त मनुष्यांतच आहे. मनुष्याशिवाय इतर प्राणिसंख्येची बुद्धि नैसर्गिक प्राण्युत्पत्तीवर व भूमिगत उद्धिज्जोत्पत्तीवर अवलंबून असते. ती कमी झाली कीं, त्यांची संख्या कमी होते, व अधिक झाली कीं, अधिक होते. मनुष्याची तशी गोष्ट नाहीं. त्याच्या शरीराच्या व मनाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याला उपजीविकेस लागणा-या पाहिजे त्या वस्तु हव्या तितक्या उत्पन्न करतां येतात. यामुळे मनुष्यांची संख्या आणि त्यांस लागणारें अन्न हीं एकसारखीं वाढत आहेत.

 हल्लींं या ठिकाणच्या लोकांच्या स्थितीला हें वरील तत्व सर्वथैव लागू पडतें. अशा येथील भयंकर जंगलांत महाबळेश्वर क्षेत्रानजिक नहर म्हणून गांव