Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८१ )

अदिलशहाच्या ताब्यांत आला; त्यावेळी कुडाळ प्रांताच्या देशमुखीचें ह्मणजे त्या प्रांतातील जमीनीचा वसूल गोळा करून तो सरकारांत भरणा करण्याचें काम आदिल- शाही दरबाराकडून एका प्रभू घराण्याकडे सोपविण्यांत आलें हैं घराणें त्या काळांत तिकडे विशेष प्रसिद्ध असून त्यांच्यांत व सांवत मंडळींत अधिकारप्राप्तीकरितां अनेक


नागोजीच्या अचाट व अलोकिक शौर्यानें बादशहा फारच खुप जाहला व त्यात बोलावून आणण्यास दिवाणास अमीरउमराव बरोबर देऊन पाठविलें. त्याप्रमाणं तो दिवाणाच्या बरोबर मोठ्या सन्मानानें आला; परंतु बादशहास कुरनिसान न करितां रामराम करून बसला. ह्या चमत्कारिक वर्तनाने बादशहास राग येऊन त्याने विचारिलें कीं, " तुझी जमीदार असता कुरनिसात केला नाहीं ? ही जमीदाराची रीत नव्हे. " त्यावर नागोजी याने उत्तर केलें कीं, जमीदाराची बेडी पायांत आहे; पण हल्लीं कचेरीत उमराव शिपाईं या नात्यानें आलों आहे, ह्मणून रामराम केला; हैं उत्तर ऐकून बादशहानें खुष होऊन सांगितलें कीं, "तुझी रामराम करूनच असावें. तुझसि ताजीम देऊं " ह्यानंतर नागोजीचा नातू सिदोजी ह्याच्या वेळेपर्यंत कोणासही दरचारी येण्याचं कारण पडलें नाहीं; परंतु बंडाळी वाढल्यामुळे बंडखोर लोकांचें पारिपत्य करण्यास शिदोजीस हुकूम झाला. शिदोजी पुंडावा मोडून बादशहाचे भेटीस गेला, त्यावेळी इब्राहीम बादशहा राज्य करीत होता. ( यावरून माने हे प्रथम बेदरच्या बादशाहीमध्ये प्रसिद्धीस आले व पुढें ते विजा- पूरच्या बादशाही दरबारति गेले, असें दिसतें. ) बादशहास रामराम करून उभे राहिले; बादशहानें कारण विचारितां रीतीप्रमाणे करीत असल्याचा ( त्यानें ) जचाच दिला; तेव्हां बादशहाने प्रचीति पाहण्याच्या हेतूने अशी व्यवस्था करविली कीं, कचेरीत शिर- ण्याच्या दरवाजावर तरवारी आडव्या बांधिल्या व कचेरीत ताठच्याताट येण्यास सांगितलें. दुसरे अमीर उमराव खाली लवून मुजरा करून बसले, शेवटीं शिदोजी आला. त्यानें आपल्या बरोबरच्या लोकांस सांगितलें कीं, सरळच जायें, तेव्हां बरोबरचे लोक कापले गेले. शेवटीं शिदोजीस दरबारांत येण्याचा प्रसंग आला. तो स्वाभिमानी व पाणीदार असल्यामुळे नत्र न होता तसाच ताठपणे येऊ लागला. तो मान कापावयास लागली तेव्हां बादशहानें शिदोजीस मागे हटण्यास सांगून तरवारी काढून घेवविल्या; व खुष होऊन सांगितलें कीं, " तुमचा बाणेदारपणा पाहून मां संतुष्ट झालों. आजपासून तुमचें नांव " माने " ठेवण्यात आले आहे. तुझीही रामरामच करावा. " ही “ माने " या उपनांवाची मूळ उत्पत्ती असून ह्या वेळेपासून त्यांचें " गवर " हैं उपनांव मार्गे पडलें; व ते आपणास " माने " झणूं लागले व तेंच उपनांव कागदोपत्री लावू लागले; आणि हीच मिसल सातारकर छत्रपतींच्या दरबारांतही तशीच राहिली.