तयार ठेवून मोगलासारख्यांच्या प्रचंड प्रतापास दाद दिली नाहीं. वाले घुमटासारख्या उम इमारती तयार करविल्या. ह्याच्यापुढे नवरत्नखचित शिरपंच लटकलेले हजारों मानकरी सरदार, अमरिउमराव आणि बडे लोक लनितेने उभे असत. रत्नभूषणांनी शृंगारिलेले शेंकडों हत्ती सज्ज असत. हा नुसता शहरांत फिरावयास गेला, तरी त्याजवर लोक सोन्याहण्याची फुले उधळीत. ह्याच्या बरोबरच्या जिलिबीच्या हजारों घोड्यांच्या जिनांस हिरे, मोत्यें, पाच, माणकें वगैरे लटकलेली असत. वारंवार द्रव्याची तुळा करून ते तो गोरगरीब व फकीर ह्यांस वांटी अशा थाटमाटांत व विलासांत शत्रूंचा फडशा पाडून, त्यानें आपली कारकीर्द लोटल्यावर अलीस राज्यपदप्राप्ती झाली. अलीच्या कारकीर्दीत अवघ्या विजापूर प्रतिति सोन्याचा धूर निघत होता. ह्याच्या हाताखाली कित्येक शूर, धीर, उदार, शहाणे, मुत्सद्दी आणि राजकारणचतुर पुरुष विराजमान झाले. शिवाजीस दाद न देतां त्यानें मोगलांस घारें केलें; कर्नाटक व चंदीसारखीं अफाट राज्य सालसा करून घेतलों. तरी ह्याच्याच १९ वर्षीच्या कारकीर्दीत अदिलशाहांचा कीर्तिसूर्य अस्ताचलाप्रत जाऊं लागला. त्याचाच अनुगामी शिकंदर मादिलशहा ह्यास अवघीं दहा वर्षे बाळपणांत राज्योपभोग घेऊन, एवढे अफाट, श्रीमान्, बलाढ्य, मजबूद व शोभिवंत राज्य औरंगझेब बादशाहाच्या हवाली करून पदरी असलेले द्रश्य व जडजवाहीर खंदकांत ओतीत व दान- धर्मं करीत औरंगझेबाच्या तंबूत जावे लागले, भाणि दांती तृण धरून कीर्तिसूर्य स अस्ताचलीं पोहोचविण्याचा प्रसंग यावा ही केवढी दुःखाची गोष्ट 111 तस्मात् " भवित- व्यता बलीयसी " हेच ह्मणणे खरें मानवप्राण्यानें ऐश्वर्यमदाने धुंद होऊन जाऊं नये; व सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अप्रतिहत इच्छेवर भरवसा ठेवून, इहपरहित संपा दण्यांत स्वशक्तीचा ध्यय करावा, हे सत्यत्व त्या वैभवोत्तुंग शिखरास पोचून प्रस्तुत जाणव स्थेस आलेल्या आदिलशाही राजधानीचे प्रत्यक्ष दर्शन घेणारांच्या व तिचा इतिहास वाचणारांच्या मनति उसल्यावांचून रहावयाचें नाहीं. "
अशाच प्रकारचें सत्यव पटवून, मानवी नाण्यास " तूं नेहमी सन्मार्गगामी
असा त्याच्या मनावर उपदेश ठरूविणारी, विजापूर येथील प्रेक्षणीय व प्रसिद्ध स्थळांची " जुम्मामशीद " ही एक इमारत आहे. ही इमारत अतीशय भव्य असून तिच्या सभामंडपाचें विस्तीर्ण पटांगण २४४ फूट लांब व १३८ फूट रुंद आहे. मुख्य इमारत या पटांगणापेक्षा धोब्याशा जास्त उंचीच्या चौथ-यावर आहे; व तिला २१ फूट रुंदीच्या अशा एकंदर ९ दर्शनी कमानी आहेत. ह्या कमानीच्या अति सभामंडपाचें विस्तीर्ण पटांगण असून त्यावरील कमानी मोठ्या आवर्धकारक अशा तंतोतंत प्रमाणानें बांधिलेल्या आहेत, त्या अशा कीं, त्यांतील पहिली आडवी ओळ बरोबर २१ फुटविर