पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 3 ) आहे एवढेच नव्हे तर १८६४ ते १८९४ पर्यंतच्या तीस वर्षात जे कांहीं प्रयत्न या बाबतींत झाले आहेत त्यावरही त्याची सरशी आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. या काळांत माधव चंद्रेबांनी आपल्या सर्वसंग्रहद्वाराः मोरोपंताची आर्यभारताची १८ ही पर्वे छापून काढलीं, केकावलि, मदालसा, सप्तशती, कृष्णविजय वगैरे मोरोपंताचे इतर ग्रंथही याचवेळी प्रसिद्ध झाले. त्याच प्रकाशकानें मुक्तश्वरच्या ओवीबद्ध भारताची आदिपर्व व सभापर्वे अशी दोन पर्वे आणि रामायण ही पुस्तकें प्रसिद्ध केली. इतर प्रकाशकांनीं वामन पंडिताचे यथार्थदीपिका, गजेंद्रमोक्ष, गोपांगति, सीतास्वयंवर वगैरे ग्रंथ प्रसिद्ध केले. रामदासांचा दासबोध, श्रीधराचे राम-- विजय, नलाख्यान, पांडवप्रताप, रुक्मिणीस्वयंवर, शिवलीलामृत वगैरे लोकप्रिय ग्रंथ, त्याचप्रसाणें महिपतीचीं साधुसंताची चरित्रे व उद्धवाचिद्घन, प्रभाकर आणि अमृतराय यांचे लहान ग्रंथ हीं सर्व पुस्तकें याच सुमारास बाहेर पडलीं. 'शुरामतlत्या गोडबोले यांनीं जुन्या मराठी काव्यांतील उतारे संकलित * व त्यांस प्रत्येक कवीचें थोडेसें जीवनवृत्त जोडून वाढवलेली आपल्या नवनीताची आवृत्ति काढली व त्यायोगें मराठी वाङ्मयाची त्यांनीं फारच मोठी सेवा केली. त्यांत जुन्या मराठी काव्याचे उत्कृष्ट मासले आले असल्यामुळे नवनीत हें मराठीतील 'गोल्डनद्रेझरी' च होऊन बसलें आहे. संस्कृत व इंग्रजी ग्रंथांची भाषांतरें करून मराठी वाड्मयाचे ऐश्वर्य वाढविण्याच्या बाबतींत या कालांत फारच मोठी प्रगति झाली. महादव शास्त्र्यांनीं अपरोक्षानुभूतीचें भाषांतर केलें. कोल्हापूरच्या महाराजांस ज्ञानदान करण्यासाठीं ह्मणुन रघुनाथशास्त्री पर्वते यांनीं गातेवर एक टीका लिहिली कृष्णा" राजवाडे यांनीं मालतीमाधवाचें भाषान्तर केलें. तर प्रसन्नराघव आणि रत्नावलि यांस मराठी रूपांतर देण्याचें श्रेय इतर शास्त्रयांनीं घेतलें. परशुराम' तात्यांनी शाकुंतल, च्छकटिक, वेणीसंहार आणि उत्तररामचारात्र यांची जोड मराठीस दिली; व कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या सुंदर साक्यांनीं मराठी वाचकांस मघदूताचा रसास्वाद् कई लागला. माधवानैदान, व्यंबकी, व भाटवडेकरांनी आर्यवैद्यक मराठीत for 'ட் दांते यांनीं मिताक्षराचें भाषांतर करून महाराष्ट्रायास कायद्याचें ज्ञान करून दिलें कृष्णशास्त्री भाटवडेकरांनी ब्युटीज ऑफ