पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) शों संबंध नसलेल्या माणसांनी स्वतंत्ररीतीने केली. या काळाच्या अखेरीस ह्णजे सन १८४७ या। वर्ष मेजर यांडी यांचा थोरल व श्रीकृष्णशास्त्री तळे- कर यांचा लहान असे दोन मराठी कोश प्रसिद्ध झालेयावरून पहिल्या दोन दशकांपेक्षां या दशकांत मराठी वाङ्मयाचे पाऊल निःसंशय पुढे पडलें असें कोणाचाही दिसून येईल. पुढील दहावर्षात १०२ पुस्तकांची भर या कॅटलगांत पडली; मागील दशकांत सुरू झालेले मराठी कवच काव्यें छापण्याचे काम सर्वास वाटत होतें याप्रमाण चालू राहून अधिक झपाट्याने होऊ लागले. शालोपयोगी पुस्तकें जरी पूर्वीप्रमाणेच निघत होतीं तरी प्रौढ वाचकवर्गासाठी जी पुस्तकें निर्माण होत त्यांच्या संख्येच्या मानाने ती फारच थोड असत. भर्तुहरीचें शतकत्रय व हितोपदेश हे ग्रंथ साथै प्रसिद्ध झाले; आणि विदुरनीतीर्ये भाषांतरही छापलें गेले. गणेशशास्त्री लेले यांचे क्यापटन कुक यांचे चरित्र, महादेवशास्त्री कोल्हा टकर यांचे कोलंबसाचे चरित्र, कृष्णशास्त्री चिपलूणकर यांचे साक्रेटिसाचे चरित्र, भवानी विश्वनाथ कानविंदे यांचे ‘ बर्थहोल्ड' (Berth-hold) चे भांषा तर, रावसाहेब मंडककृत एल्फिन्स्टनच्या इतिहासाचे भाषांतर,प्रांटडफच्या इतिहासाचे भाषांतर, क्यापटन माकडोनाल्डने केलेल्या नाना फडणविसाच्या चरित्राचे निनांची भाषांतर; आणि केरो लक्ष्मण छत्रे यचे ‘सृष्टिशास्त्र (Natural Philosophy ) वगैरे ग्रंथ इंग्रजीतून भाषांतर रूपाने आह्मांस प्राप्त झाले. कृष्णशास्त्री भाटवडेकरांचें आगगाड्यांवरील पुस्तक, कृष्ण शास्त्री चिपळूणकरांचे अर्थशास्त्र, गोविंद गंगाधर फडके यांचा ‘आत्म्याचे अमरत्व ’ या विषयावरील निबंघ, रेव्हरेन्ड बाबा पदमन्जीची ’ गृहसुधारणा (Domestic Reform ), सादीच्या एका फारशी ग्रंथाचें निनांवी भाषांतर, गोविंद गंगाधर फडके यांचे ‘ यंत्रशास्त्र' वगैरे त्यावेळ पुस्तकांवरून स्वतंत्र ग्रंथही निर्माण होऊ लागले होते हैं सिद्ध होते. सन ते १८६४ पयतचा काळ हा चौथा भाग होय. यावेळ १८५७ मराठी ग्रंथकार व भाषांतरकार यजमध्ये जी विद्याजागृति विलक्षण झाली तिच्या योगाने हा काळ झाला आहे. या आठ बर्षात कॅट फारच प्रसिद्ध लॅगांत नमूद केलेल्या ग्रंथाची संख्या जवळ जवळ ५५० आहे. जुनी कवित प्रसिद्ध करण्याच्या कामांत या पांचव्या दशकाची मागील दशकांवर सरशी