पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• मराठी वाड्याची अभिष्ट्रद्धे. भाग १ ला प्रस्तावन. Hearsteig सन १८६३ सालीं ग्रेटब्रिटन आणि आयर्लंड येथील रॉयल एशियाटिक सोसायटीचे डायरेक्टर व व्हाईस प्रेसिडेंटस् यांनी त्यावेळच्या हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांस एक पत्र लिहून अशी गोष्ट त्यांच्या नजरेसमोर * आणली की अलीकडे हिंदुस्थानांतील लोकांनीं अंशतः पुरातन संस्कृत वाङमयांतील पुष्कळ ग्रंथ प्रकाशित करून, अंशतः इंग्रजी व संस्कृत ग्रंथांची भाषांतरें आपल्या मातृभाषेत करून आणि अंशतः राजकीय, शास्त्रीय व धार्मिक विषयांवर स्वतंत्र पुस्तकें लिहून विद्याव्यासंगांत आपली तत्परता व्यक्त केली आहे. ह्या पुस्तकांची संख्या मोठी असून त्यांपैकी पुष्कळ महत्वाचीही आहेत; तरी पण ह्यांपैकीं यूरोपीय पंडितांस फारच थोडीं उपलब्ध असतात. तेव्हां आम्ही अशी सूचना करितों कीं ही हकीकत हिंदुस्थानांतील अधिकारी वर्गास कळवून आजपर्यंत निघालेल्या पुस्तकांचा कॅटलॉग प्रसिद्ध करण्यास त्यांस हुकूम द्यावा व यापुढें हिंदुस्थानांतील देशी भाषांत जीं जीं पुस्तकें व पत्रकें छापलीं जातील त्यांच्या नांवाची परिशेिप्टे प्रत्येक तिमाहास प्रसिद्ध करून त्या कॅटलॉगास जोडवावा. त्याबरहुकूम स्टेट सेक्रेटरी साहेबांनीं हिंदुस्थान सरकारला एक खलिता पाठविला; व हिंदुस्थान सरकारनें स्थानिक आधिकाच्यांस तशा त-हेचा सन १८६४ सालपर्यंतचा कॅटर्लोग प्रसिद्ध करण्यास सांगून त्यांस पुढे निघणा-या पुस्तकांची नैमासिक याद जोडण्याचा हुकूम फर्माविला. या सुमारास सर अलेक्झांडर ग्रांट हे विद्याधिकारी झाले व त्यांच्या हुकुमान्वयें १८६४ सालापर्यंत छापलेल्या संस्कृत, मराठी, गुजराथी, कानडी, सिंधी, हिंदुस्थानी व फारशी पुस्तकांचा पहिला कॅटलॅग तयार केला गेला. मराठी कॅटलॅग तयार करण्याचें काम ’ त्यांच्या वरिष्टांनीं न्या. रानडे यांजकडे सोंपविले होतें. त्यांनीं हें काम करून, आणखी त्या कॅटलॉगांत ज्या काळापर्यंत पुस्तकें आली होती त्या काळांत मराठी वाङ्मयाची अभिवृद्ध सर्व दिशेनें कसकशी होत गेली होती ह्याचही