पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४२ ) श्रेय युनिव्हर्सिटी शिक्षण अथवा पदव्या न मिळालेल्याच ग्रंथकारांस सर्वतोपरी दिलें पाहिजे. उत्तम कांदबरकार, उत्तम नाटककार, उत्तम चरित्रकार, उत्तम इतिहासकार, उत्तम कवि, उत्तम निबंधकार, वर सांगितल्या प्रमाणेंच, कांहीं अपवाद खेरीज करून, युनेिव्हर्सिटीच्या कृपाप्रसादास पात्र न झालेल्याच मंडळीतले आहेत. (१०) मराठी बद्दल कळकळ नसणें हा आमच्या मंडळींत एक सामान्य दोष आहे असें नसून, तिजबद्दल दिसून येणारी बेपर्वाई मात्र दिवसेंदिवस आधिकाआधक वाढत जात आहे. सामान्यतः सांगावयाचें ह्मणजे आमच्या मुलांची इंग्रजीस प्रारंभ होतांच, ह्मणजे सुमारे बाराव्या वर्षांच मराठींशीं फारखत होते. यामुळे त्यांचा आपल्या लोकांशीं असलेला संबंधच वस्तुतः तुटल्यासारखा होतो. आणि त्यांपैकीं पुष्कळांना पदवी प्राप्त होई तीं लेखन वाचन व संभाषण इत्यादि गोष्टी प्रचलित मातृभाषेच्या द्वारें करण्याचीही मोठी मारामार पडते. या परिचयाच्या अभावामुळे त्यांच्यांत मातृभाषेबद्दल अनादर उत्पन्न होतो, व ज्या पद्धतीच्या द्वारा आपल्या मातृभाषेत दोन वाक्यें सुद्धां नीटपणें व शुद्धरीतानें बोलतां व लिहितां येत नाहीं असे सुशिक्षित लोक निपजतात, त्या शिक्षणपद्धतीबद्दल लोकांस सहानुभूतिही वाटेनाशी होते यांत नवल तें कसलें ? शिक्षणखातें आणि युनिव्हर्सिटी ही स्थापन करण्यांत सरकारचा मुख्य उद्देश युरोपीय ज्ञानाचा फैलाव करणें हा होता, हें त्यांनीं आपल्या १८५४ च्या खलिल्यांत स्पष्टपणें जाहीर केलें आहे. हा ज्ञानप्रसार इंग्रजी भाषा व देशीभाषा यांच्या द्वारा व्हावा हा हेतुही त्यांनीं त्यांत दर्शविला होता. देशीभाषांच्या अभिवृद्धयर्थ त्या त्या भाषांत प्रोफेसरांच्या जागा ठेवावयाच्या व अशीच सोय संस्कृत व इतर अभियुक्त भाषांसंबंधीं ही साधल्यास करावयाची असा आमचा संकल्प आहे असें सरकारांनी विदित केलें होतें. आमच्या कॅलेिजांतील विद्याथ्र्यांस इंग्रजी शिकण्याबद्दल जें उत्तेजन द्यावयाचें, तें केवळ देशी भाषांची जागा सर्वतोपरी इंग्रजीनें पटकावावी ह्मणून द्यावयाचें नसून, युरोपांतील प्रगतीच्या अवलेोकनानें त्यांस भाषांतरांनी अथवा स्वतंत्र ग्रंथद्वारा आपल्या मातृभाषेची अभिवृद्धि करण्याची हळू हळू स्फूर्ति व्हावी ह्मणून द्यावयाचें असें सरकारच्या मनांत होतें -