पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(8く) लागली. आयुर्वेदविद्यालयाचे जे वर्ग वर सांगितले त्यांत कांहीं वर्षांनीं मराठांतून शिक्षण देण्याचा क्रम बंद पडला ही मोठी दुर्दैवाची गोष्ट झाली, कारण त्याचा परिणाम असा झाला कीं, मराठीत शास्त्रीय विषयांवर मोठमोठे ग्रंथ होण्याचा इा महत्वाचा मार्ग अगदीं बंद पडला, व त्यानंतर या बाबतींत कोठून उतेजनही मिळेनासें झालें. जेवढ्या इंग्रजी वैद्यक ग्रथांची भाषांतरें झालीं आहेत, त्याच्याहून दुप्पट भाषांतरें संस्कृतांतून आली आहेत; यावरून लोकांचा ओढा संस्कृत वैद्यकाकडे किती आस्थापूर्वक आहे हें सहज दिसून येईल. कायद्याच्या प्रकरणांतही ह्याच गोष्टीची पुनरावृात दिसून येते; आणि ह्मणूनच फारच थोड्या इंग्रजी कायद्यांच्या पुस्तकांचीं भाषांतरें मराठींत झालेलीं आढळतात. कायदेकानू व खटल्यांचे निकाल यांच्या भाषांतराची बरीच गर्दी मराठी कायद्यांच्या पुस्तकांत उडालेली आहे; परंतु, वरील विधान करितांना ती जमेस धरलेली नाहींत. वकीलीची परिक्षा जोपर्यंत देशी भाषांत घेतली जात असे तोंपर्यंत, मराठीत कायद्याची पुस्तकें छापण्यास बरेंच श्रोत्साहन मिळे. परंतु त्यांच्या ऐवजी इंग्रजी आल्यामुळे त्या उत्साहावर पाणी पडलें. यावरून इंग्रजी कायद्यांच्या भाषांतराच्या अल्पतेचें कारण सहज दिसून येईल. एकंदर भाषांतर या सदरांत नाटकांच्या कामीं जें यश मिळालेले आहे तसें दुसरें कशांतच मिळालेलें दिसत नाही. या कामांत बरीचशी भर संस्कृत व इंग्रजी भाषांतून पडलेली असून ती सारख्याच प्रमाणानें पडलेली आहे. शेक्स्पयर हा सर्वांस अत्यंत प्रिय झालेला दिसतो. त्याचीं २० नाहीत, तरी १८ नाटकें भाषांतरानें अथवा रूपांतरानें मराठीत आलेली आहेत. कांहीं नाटकांवैी दोन दोन तीन तीन ग्रंथकारांनी निरनिराळी भाषातरें केलेली आहेत. या ग्रंथांचीं नांवें जाणण्यास वाचक अगदीं उत्सुक असतील ह्मणुन तीं खालों नमूद केलेली आहेत. ने हैं लेद ( विकारावलासत. ). २ सिंबलाईन (तारा). ३ किंग`अर (आतडचरित). ४ आत्सवेल दट एन्ड्सवेले ( वल्लभानुनय ). ५. ए वुइंटर्स टेल (मोह। ). ६ ए कॉमेड ऑफ एरर्स (भ्रांतिचमत्कार) ५ द टेमिंग ऑफ द थ्रू (चार्टका) ८ द जंट्लमेन ऑफ व्हेरोना (कांतिपूरचे दोन गृहस्थ). ९ द मर्चद् ऑफ व्हेनिस (मणिपूरचा व्यापारी) १० अंज यू लाइकू इट् ११ मच्या अॅडो अबाउटू'नथिंग.