पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्याचे स्त्रीवादी मराठी साहित्यविश्व अवलंबून राहणार असल्याने नव्या साहित्यात नवी स्त्री' असं सूत्र रुजवण्याचे आव्हान स्त्रीवादी साहित्यापुढे आहे. वर्तमान मराठी स्त्रीवादी साहित्य आश्वासक राहिलं आहे. उद्या ते अधिक प्रगल्भ वास्तवाची कास धरणार की ‘स्त्रीत्व' प्रमाण मानणार? 'स्त्री' मनुष्य म्हणून लिंगबोधापलीकडचं तिचं अस्तित्व, व्यक्तिमत्त्व आणि जीवन चित्रित करण्याचं आव्हान मराठी स्त्रीवादी साहित्य पेलेल तर ते वैश्विक साहित्य बनल्याशिवाय राहणार नाही.

 मराठी ग्रामीण, दलित व स्त्रीवादी साहित्यापेक्षा दलितेतर वंचित साहित्यापुढील आव्हाने वेगळी व अधिक जोखमीची आहेत. एक तर वास्तववादी साहित्यप्रकार (आत्मचरित्र, चरित्र, व्यक्तिचित्र, अनुभवकथन) यांच्या तुलनेने गेल्या शतकात ज्याला ललित व रंजक (Fantacy) म्हणता येईल वा दुस-या शब्दांत कथात्मक मानता येईल (Fiction) असे वंचित साहित्य अल्प लिहिले गेले. याचे कारण समाजात वंचितांच्या प्रश्नी अपेक्षित भावजागर न होणे हे होते. त्यामुळे एकविसाव्या शतकात वास्तव आणि काल्पनिक, ललित (Fact and Fantacy) साहित्याद्वारे समाजात वंचितांचे विविध वर्ग, प्रश्न, स्वरूप, आदीवर विपुल परंतु समाजसंवेदी लेखन करण्याचे आव्हान वंचित साहित्यापुढे राहील. गेल्या शतकातील दलितेतर वंचित समाज दयेवर पोसला गेला. त्याचे चित्रणही सहानुभूतीच्या अंगाने होत राहिले. (आत्मकथेचा अपवाद वगळता). भविष्यकाळात ते सामाजिक न्यायाचा अनिवार्य भाग म्हणून मानवाधिकाराच्या पातळीवर होईल तर भविष्यातील वंचित समाज अधिक स्वाभिमानाचे जीवन जगू शकेल. वंचित संस्थांची दुःस्थिती, शासकीय व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अपेक्षित (Desirable) आर्थिक तरतुदीचा अभाव, अक्षम व अकार्यक्रम योजना यांमुळे वंचितांचे प्रश्न त्रिशंकू राहिले आहेत. या शतकाच्या वंचित साहित्यापुढे त्यांच्या हक्क व अधिकारकेंद्री मांडणीचे आव्हान आहे. वंचितांना दलितांप्रमाणे हक्क, सुविधा, सवलती दिल्याशिवाय हा समाज मध्यप्रवाहात येऊ शकणार नाही याविषयीची जाणीव, जागृती, प्रबोधन वंचित साहित्यापुढचे खरे आव्हान आहे. वंचित वर्गाच्या नाव, पत्ता, जात, धर्म, लिंग, पालक, समाजस्थिती, वंचितात इत्यादींच्या आधारे त्यांची नोंदणी, मान्यता, दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी आधारे ओळख, अस्तित्वाचा मुद्दा मूलभूत आहे. समांतर आरक्षण, शिक्षण, नोकरीत प्राधान्यता, प्रवेश, पदोन्नपती, संधी, बीजभांडवल, गृहसुविधा, उपचार, निवास, भोजन, निवारा, आरोग्य, आहार असे मानवी गरजांचे प्राथमिक प्रश्नही गेल्या शतकात न सुटल्याने त्यांना समाजात 'माणूस' म्हणून

मराठी वंचित साहित्य/७९