पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रमकेंद्रित शिक्षित समाजनिर्मितीसंदर्भात नव्या ग्रामीण साहित्यिकास देशीकरणातून मुक्त होऊन जागतिकीकरणाचे आव्हान पेलण्यास पर्याय राहणार नाही. त्यामुळे उद्याचे ग्रामीण साहित्य भाषा, पोशाख, संस्कृतीच्या वरकरणी खुणांवर रचता येणार नाही. त्याचा पाया खेड्याचे रोजच्या जगण्याचे प्रश्न हाच राहणार आहे. मराठी ग्रामीण लेखक शहरात राहून वा खेड्यात जन्मला, वाढला म्हणून साहित्य लिहीत राहील तर ती फसगत ठरेल. उद्याचे ग्रामीण साहित्य खेड्यात पाय रोवून उभारणाच्या नव्या ग्रामीण श्रमिक साहित्यिकाचे राहील. हे आव्हान मराठी ग्रामीण साहित्य कसे पेलते यावरच त्याचा मगदूर राहील. वरवरच्या वैशिष्ट्यांपेक्षा आंतरिक वृत्ती व ऊर्मी उद्याच्या ग्रामीण साहित्याची बलस्थाने ठरतील. ती हेरून लिहिण्याचे कसब पेलण्याचे आव्हान उद्याच्या ग्रामीण साहित्यापुढे राहील असे वाटते.

 सन १९७० नंतरच्या जागतिकीकरणापर्यंतच्या काळात मराठी दलित साहित्य ज्या ऊर्मीने लिहिले जात होते, ती ऊर्मी आज साहित्यात आढळत नाही, याचे कारण गेल्या तीन दशकांत दलित समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावला जाऊन तो मध्यप्रवाहात आला. शहरापुरते बोलायचे तर तो मध्यवर्गीय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळचे दलित जीवन व स्वातंत्र्योत्तर काळातील दलित जीवन यांत सकारात्मक व समाजदृष्टीने स्वकारात्मक बदल घडून आले. रोजच्या जीवन व्यवहारातील अस्पृश्यता नष्ट झाली. रोटीव्यवहार संपला तरी बेटीव्यवहारात अजून जातीय कंगोरे, आग्रह कायम आहेत. कालपरत्वे शिक्षण, व्यवसाय, उद्योग, नोकरीने स्थलांतरित दलित कुटुंबांत जीवन व शिक्षणमान वाढल्याने जातील अस्मितेचा हंकार व आग्रह शिथिल होताना उच्चशिक्षित दलित समाजात दिसतो. हे बदल येत्या काळात विकासाची तीव्र गती पाहता तेज होतील असे दिसते; पण दलितांचे प्रश्न संपले असे होणार नाही. जागतिकीकरणाने दलितांचे जातीय प्रश्न कमी होतील; पण आर्थिक संघर्ष इतर समाजाला असा भेडसावत राहील तसा तो दलित समाजाला राहणार असल्याने दलित साहित्यापुढील आव्हान बदलता दलित समाजचित्रणाचे राहणार आहे. दलित साहित्य जातीय परिघातून कालभान म्हणून बाहेर येऊन ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘जाती अंताचे स्वप्न' जितक्या लवकर प्रत्यक्षात आणेल तितक्या लवकर त्याचे समाजजीवन बदलेल. अमेरिकन साहित्यात 'ब्लॅक लिटरेचर'मध्ये झालेला बदल हा अस्तित्वभान व जाणीवपूर्वक बदलांचा स्वीकार यामुळे झाला. आपणाकडे तशा स्वरूपाचे परिवर्तन होताना आढळत नाही. साहित्याचे कार्य केवळ वास्तव चित्रण नसते. भविष्यलक्ष्यी जाणिवा विकसित करण्याचे कार्य वर्तमान

मराठी वंचित साहित्य/७७