पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शैक्षणिक संस्था जितक्या उदयाला आल्या तितक्या सनातनी नाही. त्याचा एक प्रभाव व प्रवाह साहित्य विचारात दिसून येतो.

 इंग्रजी भाषेचा महाराष्ट्र समाजातील प्रचार व प्रसार हेही साहित्य दर्जा उंचावण्याचे एक महत्त्वाचे कारण होय. इथे इयत्ता पाचवी पासून इंग्रजी संपर्क झाल्याने, प्रशासनात इंग्रजी वापर व वर्चस्व राहिल्याने, शिवाय नवशिक्षणातील मराठी माणसाचे नित्य समायोजन हेही दर्जावाढीचे एक महत्त्वाचे कारण होय. मराठी भाषा व साहित्याचा विचार आपण नेहमीच विश्वभाषा इंग्रजीच्या संदर्भाने, सहवास व देवाणघेवाणीतून करीत आल्यानेही मराठी भाषा व साहित्याचा दर्जा भारतीय भाषांत वरचा राहत आला आहे.

मराठी वंचित साहित्य/७५