पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विकास, परित्यक्तांचा, वृद्धांचा सांभाळ, अनाथाश्रम, रिमांड होमची स्थिती व तेथील मुलांचे प्रश्न इत्यादींवर प्रकाश पडून वंचितांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, संस्कार, पुनर्वसन, शासनीची भूमिका यांवर क्ष-किरणीय दृश्य उभारायला मोठी मदत होते.
 अनारस मुलांचे प्रश्न डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या ‘अक्करमाशी (१९८४) आणि ‘बारामाशी' (१९८८) या दोन आत्मचरित्रांतून मांडले आहेत. ‘खाली जमीन, वर आकाश'चा पूर्वार्धही याच विषयाशी संबंधित आहे; पण संदर्भ वेगळा. पोरक्या मुलांच्या जीवनाची फरफट ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी आपल्या ‘पोरके दिवस' (१९९४) मधून व्यक्त केली आहे. याच विषयावरील पण संदर्भाने वेगळे इंदुमती जोंधळे यांचे 'बिनपटाची चौकट' (१९९४) आहे. या सर्व आत्मकथांचे हिंदी अनुवाद उपलब्ध आहेत.
 स्त्रीजीवनाच्या व्यथा, वेदना, उपेक्षांच्या चित्रणाची मराठीतील स्त्रियांची आत्मचरित्रे खरे तर वंचित साहित्याचाच ठेवा. त्यात 'सांगत्ये ऐका' (१९७०), ‘स्नेहांकिता' (१९७३) ही अनुक्रमे हंसा वाडकर आणि स्नेहलता प्रधान या अभिनेत्रींची आत्मचरित्रे लक्षात येतात. सत्यभामाबाई सुखात्मेंचं ‘गेले ते दिवस' (१९६४), सरोजनी सारंगपाणी लिखित ‘दुर्दैवाशी दोन हात' (१९७५),आनंदीबाई विजापुरे यांचं ‘अजुनि चालतेचि वाट' (१९९४) वाचीत असताना मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही.
 समाजजीवनात वेश्या, बारबाला, हिजड़ा, लिंगपरिवर्तित, मनोरुग्ण, मतिमंद, बहविकलांगांचं जीवन कुणाच्याही वाट्याला येऊ नये, अशांची आत्मचरित्रे वाचीत असताना समाजाचा कोडगेपणा, शासनाची निष्ठुरता आणि निष्क्रियता प्रकर्षाने पुढे येते. वैशाली हळदणकरांचं ‘बारबाला' (२००८), जमिला नलिनचं ‘सेक्स वर्कर' (२०१०), सर्वानन विद्याचं ‘आय अॅम विद्या (२०१०), लक्ष्मी नारायण त्रिपाठी लिखित 'मी हिजडा, मी लक्ष्मी' (२०१२). कवी व प्राध्यापक श्रावण चौधरींचं ‘स्किझोफ्रेनिया' वाचीत असताना वंचितांच्या यातनांनी वाचकांची मने पिळवटून जातात. अलीकडचं डॉ. सुनीलकुमार लवटेंचं ‘आत्मस्वर' (२०१३) त्यातील लेख व मुलाखतींतून वंचित जगाचं दुसरं चित्र व विचार सांगते.

 रस्त्यावरची मुलं, अंध, वेश्यांची मुले, एड्सग्रस्त, फासेपारधींसारख्या अपराधी (नसताना) समजल्या जाणाच्या जमाती, कुष्ठपीडित, भिक्षेकरी, बंदीजन, गुन्हेगार यांच्या विकासाचे कार्य करणाच्या समाजात अनेक संस्था, संघटना, गट, स्वयंसेवी संस्था आहेत. अशामध्ये आयुष्य झोकून देऊन

मराठी वंचित साहित्य/६८