पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धोरण आहे (केंद्राचे पण आणि राज्यांचे पण); परंतु योजना, आर्थिक तरतूद नगण्य. ही परंपरा आपल्याकडे ब्रिटिशांनी येऊन राज्य सुरू केल्यापासून जशी आहे, तशीच आहे. नाही म्हणायला विभाग, योजनांची नामांतरे झाली. तरतुदीत किरकोळ वाढी झाल्या. वंचितांच्या वनवास काही संपला नाही. वंचितांपैकी मोठा वर्ग त्यांना जात, धर्म, नाव असा अस्तित्वाच्या खुणा नसलेला. सामाजिक न्यायाचे ते पहिले हक्कदार; पण नियोजक, लोकप्रतिनिधींच्या ते गावी नाहीत. तीच स्थिती साहित्याची. या वंचितांवर मराठीत विपुल लिहिलं तरी त्यांच्या साहित्याला स्वतंत्र प्रवाह म्हणून समीक्षक मानत नाहीत; कारण त्यांनी अजून अनाथाश्रम, रिमांड होम, तुरुंग, भिक्षेकरी गृहे, स्त्री-आधार केंद्रे, वेश्यागृहे, वृद्धाश्रम, होसस्पेस होम्स, मनोरुग्णालये पाहिली नाहीत. त्यांत डोकावावे असे कधी त्यांना आजवर वाटले नाही.
 वंचितांचे जगण्याचे प्रश्न ग्रामीण, दलित, महिलांइतकेच ऐरणीवरचे आहेत. काही वंचितांचे प्रश्न तर दलितांपेक्षा भयंकर आहेत. वंचितांचे प्रश्न आजचे नाहीत. आपल्या सर्व प्राचीन वाङ्मयात ते प्रतिबिंबित आहेत. म्हणजेच ते पूर्वापर आहेत. वेद, पुराणे, रामायण, महाभारत, उपनिषद, सूक्त आदीमध्ये आहे. मराठी प्राचीन वाङ्मयात आहेत. कर्ण, कुंती, विश्वामित्र, शकुंतला, द्रौपदी, अश्वत्थामा, पेंद्या, कुब्जा, कैकेयी, रावण व्यक्ती तर आहेतच; पण प्रश्न, वृत्तीपण आहेत. संत, पंत, तंत साहित्यात वंचित व्यक्ती, जीवन प्रश्न आहेत आणि आधुनिक साहित्यात पण. कर्णाला कवचकुंडले होती तशी आज अनौरस बालकांना आहेत का? त्यांनी अक्कमाशी म्हणून का जगायचं? कुंतीने सूर्यालाच दु:ख मागायचं? कुब्जाचं कुबड जाणार की नाही? अश्वत्थाम्याची जखम भरणार की नाही? द्रौपदीहरण थांबणार का? असे प्रश्न कालही होते, आजही आहेत. आपण ते हद्दपार करणार की नाही? देवी, क्षय, पोलिओ हद्दपार होऊ शकतात. सामाजिक वंचितता, दलितत्व, स्त्री-अत्याचार कधी संपणार ?

 या साच्या अस्वस्थतेतून महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. कुमारी मातांचं संरक्षण केलं नि तिचं बाळ दत्तक घेऊन आदर्श घालून दिला. महर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवेशी लग्न करून स्त्रीसंरक्षण, स्त्रीशिक्षण, स्त्रीपुनर्वसन कार्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बापूजी साळुखे यांनी अनाथ, निराधार गृहे चालविली. या सर्वांनी कार्य केले. जे केलं ते थोडंफार लिहूनही ठेवलं आहे. अशांचं जीवन, साहित्य, कार्य, विचार साहित्यिक प्रा. वा. म. जोशींपासून अनेकांनी लिहिलं आहे. प्रा. श्री. म. माटे यांचं ‘उपेक्षितांचे अंतरंग', अत्रेचं ‘गावगाडा',

मराठी वंचित साहित्य/६६