पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘एकेक पान गळावया' (तीन लघुकादंबरिका संच) (१९८0), 'तेरुओ', ‘काही दूरपर्यंत' (१९८५), ‘निरगाठी', 'चंद्रिके गं, सारिके गं' (१९८७), ‘दुस्तर हा घाट, थांग' (१९८९) या कादंब-या स्त्रीवादाची पक्की मांडणी करणाच्या. यातून त्यांनी स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आशा, आकांक्षा, इच्छांची मोकळी व वेगळी मांडणी केली.
 नव्वदोत्तर कालखंडात अंबिका सरकारांच्या ‘एक श्वासाचं अंतर' आणि ‘चाहूल', आशा बगेंची ‘त्रिदल' (१९९४), शांता गोखलेंची ‘रिटा वेलिणकर (१९८९), सानियांची ‘स्थलांतर' (१९९४) आणि ‘आवर्तन' (१९९६) या कादंबच्या स्त्रीच्या आत्मशोधाच्या व स्वयंनिर्णय प्रक्रियेस बांधील राहून होणा-या परिणामांना सामोरया जाणा-या स्वतंत्र स्त्री व्यक्तिमत्त्वाची घडण, निर्मितीचे महत्त्व समजावणाच्या आहेत. स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार' अशी खूणगाठ मनाशी बांधून स्त्रीस्वातंत्र्याचा संकोच करू पाहणाच्या पारंपरिक पुरुषी मानसिकतेस छेद देणाच्या या कादंब-यांचे साहित्यिक मूल्य तर आहेच. सामाजिक स्थिती परिवर्तनातील या कादंब-यांची कामगिरीपण तितकीच महत्त्वाची आहे. काही कादंब-यांतून स्त्रीच्या अत्याधुनिक प्रतिमा रंगविल्या गेल्या. त्यात उत्तान लैंगिक वर्णनेही नि:संकोच आली. बदलाचे वास्तव म्हणून त्याकडे पाहायला हवे. भडक, उथळ अशी विशेषणे त्यांना लावता आली तरी त्यांना काल्पनिक म्हणता येणार नाही. या प्रकारे स्त्रीवादी कादंबरी काळाची आव्हाने व बदल पेलत, स्वीकारत नित्यनूतन होत आहे. चांगले, वाईट काळ ठरवितो. शिवाय हे सापेक्षही असते.
 आधुनिक स्त्रीवादी मराठी कविता ही पहिल्या महायुद्धानंतर उदयाला आली. प्रारंभीच्या स्त्रियांच्या काव्यात धार्मिक, कौटुंबिक भाव दिसतात. पुढे त्याची जागा समाज घेतो. 'स्त्रियांकरिता गाण्याचे पुस्तक' (१८८३) अशी सुरुवात झालेला हा काव्यप्रवाह पुढे अंगाई गीते, आंदोलक गीते, व्रतक्षेत्र गीते, आध्यात्मिक गीते इत्यादी रूपांत सन १९१५ पर्यंत प्रकाशित होत राहिली. मग ‘स्त्रीगीत रत्नमंजूषा', 'वनिता गीत पुष्पमाला', 'स्त्रीगीतमाला' येत राहिल्या.

 पण जिला आधुनिक स्त्रीवादी कविता म्हणता येईल असं काव्य संजीवनी मराठे यांच्या कवितांत भेटतं. 'काव्यसंजीवनी' (१९३२), 'राका' (१९३९), ‘संसार' (१९४३), ‘छाया' (१९४६) हे त्यांचे काव्यसंग्रह म्हणजे आधुनिक स्त्रीवादी काव्याची आद्यरूपं होत. मग शांता शेळकेंचा काव्यसंग्रह 'वर्षा' (१९४७) आला. स्वातंत्र्यपूर्व काळात लेखन करणाच्या दोन श्रेष्ठ कवयित्री म्हणजे लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी. लक्ष्मीबाईंचा काव्यसंग्रह

मराठी वंचित साहित्य/६२