पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सवत' (१९१७), ‘सौभाग्यतिलक' (१९१८), ‘पातिव्रत्याची कसोटी' (१९१९), व्यत्यास म्हणून लिहिलेली ‘पत्निव्रताची कसोटी' (१९२१), ‘अघोर पातक' (१९२४), 'मूकनायिका' (१९२५) अशा सरस कादंबच्या लिहून पतिसुख, व्रतवैकल्ये, सवत स्वीकार, विवाहरूढी, स्त्रीचं दुय्यमत्त्व इत्यादी विषयांचे वर्णन करून स्त्रीजागृती केली. यशोदाबाई भट यांची ‘मुलांचे बंड' (१९२१), कमलाबाई सोहनींची ‘कुठे?' कादंब-या याच काळातील. पिरोज आनंदकर या त्या काळातील गाजलेल्या लेखिका. 'इंद्रधनूचा पूल'सारखी मालिका लिहून सर्वप्रथम लैंगिक शिक्षणविषयक लेखन केलं. ते ‘स्त्री' मासिकातून प्रकाशित झाल्याचं आठवतं. त्यांची ‘माझं बाळ ते' (१९२७) कादंबरी. ती गृहिणीपेक्षा स्त्रीस समाजसेविका होण्याचं वेगळेपण समजावते. शांताबाई नाशिककर यांच्या कादंबच्या शीर्षकापासूनच थेट विषयाला भिडणा-या असत. ‘कौमुदी' (१९२६), 'लग्नाचा बाजार' (१९२९), ‘हाच कां धर्म?' (१९३०), ‘साम्राज्यासाठी' (१९३१), 'चिखलातले कमळ' (१९३९), 'माझी कोरीव लेणी' (१९४0), 'कीर्ती' (१९४२) या आपल्या कादंब-यांतून विषम विवाह, प्रीतिविवाह, हुंडा, घातक चाली, अस्पृश्यता इत्यादी समकालीन प्रश्न मांडले. कमलाबाई बंबेवालेंची ‘बंधमुक्ता' (१९३०) त्या काळात लक्षणीय ठरली होती, ती त्यातील नायिकेच्या घटस्फोटाच्या मागणीमुळे. त्या काळात स्त्रीस घटस्फोटाचा अधिकार नव्हता, हे या संदर्भात लक्षात घ्यायला हवे. बाळूताई, धडा घे' (१९३१) ही इंदिराबाई सहस्त्रबुद्धेची आत्मकथनात्मक शैलीतील कादंबरी. ती स्त्रीला स्वत:चे लग्न स्वतः ठरविण्याचा अधिकार असला पाहिजे, असा आग्रह धरते.
 विभावरी शिरूरकर या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील महत्त्वाच्या परंतु व्यवच्छेदक कादंबरीकार. त्यांनी स्त्रीविकासाचे कार्य केले व नंतर ते शब्दबद्ध केलं. म्हणून त्यांच्या लेखनास वंचित स्त्रियांच्या दु:खाची वास्तविक खोली आहे. दुसरे असे की, त्यांचे सारे लेखन सत्यघटना, पात्रे यांवर आधारित असल्याने त्यांचे सामाजिक महत्त्व आहे. शिवाय लेखनासंबंधी प्रतिबद्ध स्त्रीवादी भूमिका यामुळेही त्यांचे लेखन मळलेली वाट सोडून होते. हिंदोळ्यावर (१९३४), ‘विरलेले स्वप्न’ आणि ‘बळी' (१९५०) या तीनही कादंबच्या स्त्रीवादी, दलित, वंचित अशा विविध विचारप्रवाहांचा संगम म्हणून साकारतात. स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीविकास अशी त्रिसूत्री घेऊन येणारी ही कादंबरीत्रयी स्त्रीचा माणूस म्हणून विचार करणारी पहिली रचना होय.

 स्वातंत्र्योत्तर कालखंडात कमल देसाईलिखित 'काळा सूर्य व हॅट घालणारी बाई' (१९७५), गौरी देशपांडेंच्या कारावासातून पत्रे', 'मध्य लटपटीत',

मराठी वंचित साहित्य/६१