पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘मराठी वंचित साहित्य : दर्जा आणि आव्हाने' विषयावर लेख हवा आहे. तुम्ही यावर विचार, कार्य, लेखन करीत आलेलाच आहात तर लिहा."मागोमाग डॉ. अंधारेंशीही बोलणं झालं. त्यानिमित्ताने जुन्या संकल्पाला प्रेरणा मिळाली व एक टिपण तयार करून पाठवून दिलं. ते पन्नास पृष्ठांचं होतं. त्यांना हवा होता छोटा लेख. तो करून पाठविला; पण मूळ टिपण गप्प बसू देईना. मग यावरचं पूर्वलेखन व वर्तमान टिपण असा मेळ घालून एक छोटेखानी पुस्तक तयार होईल असं वाटलं. ते हेच पुस्तक.
 महाराष्ट्र शासनाने अनाथांसाठी खुल्या प्रवर्गात १% समांतर आरक्षण देऊ केले आहे. ही स्वागतार्ह बाब होय. पण तिची कार्यवाही शासन किती मनःपूर्वक करते यावर वंचित विकासाचे भवितव्य अवलंबून आहे.
 याचे प्रेरक परिवर्तनाचा वाटसरू'चे संपादक अभयकांता, प्रा. अविनाश सप्रे, प्राचार्य रमेश अंधारे व प्रकाशक अमेश जोशी यांचे आभार.

- डॉ. सुनीलकुमार लवटे

* दि. २० जुलै, २०१४,
मानव चांद्र मोहीम,
४५ वा वर्धापनदिन.