पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बुळगा ठरविणारा हा कवी हिकमती खरा! गोलपिठ्यावरून नागवणा-यांना ही कविता खबरदारीचा इशारा देत धाक निर्माण करते, हे या कवीचं बळ. त्यांची कविता सूर्योन्मुख, म्हणून निर्मितीक्षमही. स्वातंत्र्य कुठल्या गाढविणीचं नाव आहे?' अशी पृच्छा करणारी नामदेव ढसाळांची कविता भगोष्ठ, रांड आदी शब्दप्रयोग करीत फसवी सभ्यता नाकारते. अशी थेट भेटणारी कविता मराठी दलित काव्यात दुसरी नाही.
 मराठी दलित काव्यात दया पवारांचा 'कोंडवाडा', केशव मेश्रामांचे ‘उत्खनन’, ‘जुगलबंदी’, ‘अकस्मात', अर्जुन डांगळेचा ‘छावणी हलते आहे', वामन निंबाळकरांचा ‘गावकुसाबाहेरील कविता', प्रल्हाद चेंदवणकरांचे ‘ऑडिट', ‘ऑर्डर, ऑर्डर'सारखे संग्रह, त्र्यंबक सपकाळांचा ‘सुरुंग', यशवंत मनोहरांची ‘उत्थानगुंफा', ज. वि. पवारांची ‘नाकेबंदी', बाबूराव बागूलयांच्या ‘विद्रोहाच्या कविता', शरणकुमार लिंबाळेचा ‘उत्पात', प्रज्ञावंत गौतमांचा ‘माझा द्वेष पोसलाय' (१९७९), भीमसेन देवेंचा होरपळ', 'कृष्णमेघ', प्रज्ञा लोखंडेंचा ‘अंतस्थ' (१९९३), ‘उत्कट जीवघेण्या धगीवर' (२००२), 'मी भिडवू पाहते समग्राशी डोळा' (२००७), ‘आरपार लयीत प्राणांतिक' (२००९), ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र' (२०१३) या सर्वांचा विचार करता लक्षात येतं की काळाची आव्हानं, प्रश्न पेलत ही कविता प्रौढ होते आहे, झालीही आहे. तिला समष्टीचे भान आहे, भविष्यवेधही! वाहरू सोनवणेसारख्या कवीच्या ‘गोधड' (१९८७) नी ती बहुपेडी बनली आहे. अरुण काळेचा ‘सायरनचे शहर' जागतिकीकरणापासून वाचण्याचा इशारा देताना दिसते. तिकडे लोकनाथ यशवंत ‘आता होऊन जाऊ द्या' म्हणत दोन हात करायची तयारी दाखवते, तर ‘शेवटी काय झाले ?' विचारत भविष्याविषयी साशंकता व्यक्त करते. लहू कानडेंची ‘टाचाटिभा', 'क्रांतिपर्व चर्मकार समाजाचे टाके, टोचे शब्दमय करते.

 मराठी दलित नाटक हे प्रारंभीच्या काळात लोकसाहित्याच्या रूपात दिसते. शाहिरी, पोवाडे, वग, लोकनाट्य असं त्याचं प्रारंभिक स्वरूप दिसून येतं. फार्स, जलसेही आढळतात. अनेक दलित लोक साहित्यकारांच्या रचना पूर्वापर दिसून येतात. सर्वश्री दगडू साळी, गेनबा वाघोलीकर, तात्या सावळजकर, बापू नारायण गावकर, बापू कुपवाडकर, शिवा-संभा कौलापूरकर, रामानामा लवळेकर, दादू इंदुरीकर, भाऊ फक्कड अशी काही नावे या संदर्भात सांगता येतील. यांनी आपल्या रचनांमधून शोषक-शोषित जमीनदार-कूळ, मालकमजूर असे संवाद, कलगी-तुरे, कवने, पोवाडे, एकांकिका लिहिल्या. तो काळ राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, समाजसुधारणांचा

मराठी वंचित साहित्य/५३