त्यातील फेर धरून गाण्यांचा उलगडा करण्यास मदत करू शकते. कन्याही अत्यन्त महत्त्वाची. तिच्यातील सुफलन शक्ती परमपदाला पोहोचलेली असते. तिचा कृषिविषयक यातुविधीत अत्यन्त महत्त्वाचा सहभाग होता. तिला समाजव्यवस्थेत जीवन जगण्याच्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचे स्थान होते हे या कुमारिकांच्या उत्सवांचा शोध घेताना जाणवते.
मूलतः कृषिसंलग्न यातुविधींच्या स्वरूपात निर्माण झालेल्या खेळोत्सवांचे स्वरूप कालौघात बदलत गेले. काही भागातील त्यांचे अस्तित्व नष्ट झाले. मराठवाड्यातील सात जिल्हे वर्षानुवर्षे निझामाच्या अमलाखाली होते. या भागात भोंडला व भुलाबाई मांडण्याचा वा खेळण्याचा रिवाज लुप्त झाला आहे. हिंगोली परिसरातला जो भाग विदर्भाच्या सीमेला लागटून आहे तेथे मात्र भुलाबाई काही घरांतून मांडली जाते. मराठवाड्यातील नामवंत चित्रकार भ.मा. पसरवाळे यांनी ही माहिती दिली. भुलाबाईत पूर्ववैदिक काळातील लोकधर्मी संस्कृतीच्या खुणा अधिक स्पष्ट रूपात दृगोचार होतात. खानदेशात वा विदर्भात भुलाबाई सर्व जातिजमातीत मांडली जाते. दलित समाजातही ती खेळली जाई. भोंडला वा हादगा मात्र उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जातींत खेळला जाई. मात्र दोन्ही खेळोत्सवांतील गाणी सारखी आहेत. एवढेच नाही तर भराडी गौर, इनाई यांची गाणीही त्याच प्रकारची आहेत.
भोंडला, मुलाबाई, इनाई; भराडी गौर, यांच्या गाण्यांसबंधीचा विशेष शोध पुढील प्रकरणात घेतला आहे.
पान:भूमी आणि स्त्री.pdf/९७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२
भूमी आणि स्त्री