Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घडणारे बदल-ऊन, पाऊस, जनन, मरण, वनस्पती जीवन, बदलणारे ऋतू - आदिमानवाला अद्भुत वाटत.या क्रियांवर नियंत्रण करण्याची शक्ती मिळविणाच्या दुर्दम्य आकांक्षेतून सामूहिक यातुविधींची निर्मिती झाली असावी. जमिनीची सुफलनशक्ती वाढून अपरंपार धान्य निर्माण व्हावे, वेळवर पाऊस पडावा इत्यादी कृषीशी जोडलेल्या घटनांसाठी सामूहिक यातुविधी केले जात. आदिम मानवसमूहाची एकूण जीवनपद्धती 'यातु' विधींनी नियंत्रित होती असे मानले जाते. या यातुविधींचे सामर्थ्य समूहाच्या, मानसिकेत होते. वेद काळतही अन्नसमृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना म्हटल्या जात. छांदोग्य उपनिषदात १४'उद्गीथ' आहे 'उद्गीथ' म्हणजे अन्नसमृद्धीसाठी गायलेली गाणी. उद् म्हणजे श्वसन, गी म्हणजे वाणी आणि थ म्हणजे अन्न. संपूर्ण जगाचे जीवन अन्नावर निर्भर आहे याची जाणीव प्राचीन मानवाला होती, श्रम सुकर व्हावेत यासाठीही सामूहिक गीते गायिली जात असावीत. सामूहिक स्वरांमध्ये एक झपाटलेली लय असते. त्या लयीचा परिणाम परिसरावर, वातावरणावर होत असतो. या सामूहिक मंत्रात्मक गीतांचे कालौघात उन्नयन झाले असावे. हे यातुविधी सणांच्या, व्रतांच्या, उत्सवांच्या माध्यमातून तत्संबंधी गीतांतून जतन केले गेले.
 भाद्रपद, आधिन सर्जन वर्षनाचे महिने -
 पाऊस यावा,-सुफलनशक्ती वाढावी, भूमीचे रक्षण करणाऱ्यांची आराधना करावी या उद्देशाने केले जाणारे यातुविधी सामूहिक रूपात आणि प्रत्यक्ष नाट्याच्या स्वरूपात भूमीवर, उघड्यावर केले जात असावेत.आजही चांदण्या रात्री आदिवासी स्त्री पुरुष...तरूण म्हातारे, सारेच एकत्र येऊन मध्यात भाताची रास ठेवून, जवळ दिवा लावून 'धेना'...नमन गातात.
  घेना गायल्या रे आप धरतारी देवा
  घेना गायल्या रे आप घरतरे
  घेना गायल्या रे आप कणसरी देवा
  घेना गायल्या रे आप कणसरे....
 हा 'नारन' देवाचा धावा पिकाच्या समृद्धीशी असून भाद्रपदात नवे धान्य खाण्यापूर्वी केला जातो. महाराष्ट्रात भाद्रपद, आश्विनात कुमारिकांचे खेळोत्सव सामूहिक रीतीने साजरे होतात.

७६
भूमी आणि स्त्री