पान:भूमी आणि स्त्री.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १२तव करकमलस्था स्फाटिकिंमक्षमाला
 नरवकिरणविभिन्ना दाडिमीबीजबुद्धया
 प्रतिखलुमनुकर्षन् येन कीरो निशिद्धः
 सभवतु मम भुत्यै वाणी ते मंदहासा।।

 गणेश आणि सरस्वती याज्ञानदायक देवता मानल्या जातात. चान्द्रसेनी कायस्थ प्रभूंमध्ये नवसत्रात कुमारिकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादात डाळिंबाच्या दाण्यांचा आवर्जून समावेश असतो.
 १३ही कुमारिका निरोगी, अव्यंग, निर्दोष, परिपूर्णा असावी असा संकेत असतो. ती साधारणपणे दोन ते दहा वर्षांची असावी असा प्रघात आहे. कुमारी पूजा करताना पुढील मंत्राने तिचे आवाहन करतात -
 मंत्राक्षरमयी लक्ष्मी मातृणाम् रूपधारिणीम्।
 नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यामावाहयाम्यहम्।।
 (मंत्रक्षरमय, लक्ष्मीस्वरूप, मातृकांचे रूप धारण करणारी व साक्षात नवदुर्गात्मिका अशा कन्येचे मी आवाहन करतो.)
 लक्ष्मी वा समृद्धीची सर्व रूपे मूलतः कुमारिका असणाऱ्या कन्येने धारण केली आहेत. आदिमाया वा प्रकृती ही कुमारिकाआहे. नवरात्रीची पूजाही सुफलनशक्तीची पूजा आहे. धनधान्य समृद्धीचे कारण असणाऱ्या उर्वरा वा सर्जनशक्तीने परिपूर्ण असलेल्या अनंत, अक्षय, अभंग असणाऱ्या 'कुमारिका' भूमीची ती पूजा आहे.
 अन्नसमृद्धीशी जोडलेल्या यातुविधींचे कालौघात उन्नयन -
 प्राथमिक अवस्थेतील कृषिप्रधान मानवसमूहाने, सुफलीकरणासाठी यातुविधी करण्याची परंपरा निर्माण केली असावी. सर्जन आणि वर्षन या दोन्ही क्रिया सर्वसाधारणपणे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या महिन्यांत कृतिशील असतात. पाऊस पडला तर धरणीच्या गर्भात बियाणे रुजून धान्य हाती येणार. भारतातील सुमारे ७० टक्के समाज आजही शेतीवर अवलंबून आहे. प्राचीन काळी अन्न हेच जीवन असल्याने आदिमानवाचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक व्यवहार 'शेती' वर केंद्रित झालेले असत. एकूणच लोकधर्म कृषिप्रधान होता. कृषिकर्माशी संबंधित यातुविधींची परंपरा अत्यन्त प्राचीन आहे. निसर्गात सातत्याने

भूमी आणि स्त्री
७५