पान:भूमी आणि स्त्री.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अवशेष उत्खननातून उपलब्ध झाले आहेत.
 संघर्ष, समन्वय आणि स्वीकार यातून एकात्म संस्कृती -
 संघर्ष, समन्वय आणि स्वीकार या तीन प्रक्रिया भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत सातत्याने आहेत. ६व्या शतकानंतर गणपतीच्या स्वरूपात बदल झाला. तरीही आज म्हणताना आपण 'गौरी गणपती' हा वाक्प्रचार वापरतो. गौरी ही गणपतीची माता आहे. गणपती खरे तर दीड वा अडीच दिवसांचा असतो. गणपती बोळवतात आणि गौरी घरी आणतात. गौरी, ज्यांना मराठवाड्यात लक्ष्म्या म्हणतात त्यांचे महत्त्व अधिक असते. श्रावण, भाद्रपद, आश्विन या काळात आचरावयाच्या स्त्रीव्रतांचा सूक्ष्म अभ्यास केल्यास असे लक्षात येते की स्त्रीमाहात्म्य आणि कृषिविषयक समृद्धी यांचा अन्योन्य संबंध आहे. ऋषिपंचमी, हरितालिका, गौरी वा लक्ष्म्या, नवरात्र आदी व्रते वनस्पती समृद्धीशी जोडलेली आहेत. या व्रतांमधील शिव वा गणपती या पुरुषदेवता अध्याहृत असतात, गौण असतात. म्हसोबा, भुलोबा, साकरोबा आदी क्षेत्रपाळांची रूपे मुळात शिवाची, शंकराची आहेत. या सर्वांचा अधिपती असा महादेव आहे.
 मुंजा : शेतीचे रक्षण करणारा जागल्या -
 सुफलीकरणाशी संबंधित असे आणखीन एक महत्त्वाचे कृषिदैवत म्हणजे मुंजा. मुंजा हा क्षेत्रपाळापेक्षा विघ्नहर्त्यांची भूमिका पार पाडत असतो. त्याचा निवास वड, पिंपळ अशा झाडांवर असतो. मुंजा हा मौंज झालेल्या ब्रह्मचारी मृताचा आत्मा असतो. तो अत्यंत शक्तिशाली आणि ज्याच्यात अपरंपार यातुशक्ती आहे असा मृतात्मा असतो. अशी लोकसामान्यांची श्रद्धा असते. शेताचे, पिकाचे, शेतातील जनावरांचे तो रोगराई आणि दुष्ट शक्तींपासून रक्षण करतो असा समज रुढ आहे. यालाच वीरोबा असेही म्हणतात. गावाच्या शिवेवर या वीरोबाचे ठाणे असते. ग्रामदैवतांच्या आणि वीरोबाच्या रूपात एकप्रकारे ही यक्षपूजाच प्रचलित आहे असे लोकसाहित्याच्या अभ्यासकांना वाटते. द. ग. गोडसे यांच्या मते यक्षपूजा ही आर्यपूर्व असून तेथील समाजजीवनात ओतप्रोत रुजली आहे. ही उपासना शैव उपासनेच्या पूर्वीपासून रुढ असावी. कालौघात नंतर त्यावर शैवउपासनेचे संस्कार झाले. या संदर्भात द. ग. गोडसे लिहितात 'कोणत्याही संकटापासून गावाचे रक्षण करणाऱ्या ग्रामस्थांचे प्राकृतिक स्वास्थ्य सांभाळणाऱ्या गावातील नैतिक आणि नैष्ठिक

भूमी आणि स्त्री
५३