सर्जनप्रक्रियेत बीजाचे महत्त्व -
सर्जन प्रक्रियेत बीज आणि पाण्याची भूमिका अत्यन्त महत्त्वाची असते याची जाणीव झाल्यावर स्त्रीदेवतांच्या जोडीला पुरुषदेवतांची पूजा होऊ लागली. मात्र सर्जनातील पुरुषाची भूमिका तटस्थ असते याचे भान आदिम कृषिजीवी समाजाला असल्याने पुरुषदेवता क्षेत्रपालाच्या रूपात पुढे आल्या. योनिपूजेप्रमाणेच लिंगपूजा होऊ लागली. मोहंजोदारो, हरप्पाच्या उत्खननात लिंगाच्या आकाराचे अनेक दगड सापडले आहेत. सैधव संस्कृतीतील मातृसत्ताक समाज लिंगपूजक होता. वैदिक आर्य लिंगपूजेस हीन मानीत ते आपल्या शत्रूना 'शिश्नदेवाः'१५ या अत्यन्त हीनत्वदर्शक नावाने संबोधत. लिंगपूजेच्या अनुशंगाने वृषभ आणि बोकड वीर्यसिंचनाने श्रेष्ठ प्रतीक म्हणून पूजिले जात. आजही शेतीतील धान्य घरी नेण्यापूर्वी शेतात ढवारा केला जातो. मराठवाड्यात ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते. त्यावेळी म्हसोबा या क्षेत्रपाळाला बोकडाचा बळी चढवितात. त्याचे रक्त सर्वत्र शिंपडतात. पोळ्याला बैलाचा सन्मान करतात. त्याला न्हाऊमाखू घालताना त्याचे मूत्र, शेण, शेतात पडावे ही भावना शेतकऱ्याची असते. कृषिव्यवसायाशी निगडित लोकदैवते, म्हसोबा, भुलोबा, भांगलोबा, शिराळशेठ, नागोबा आदी क्षेत्रपाळाच्या रूपात आणि दगडाच्या वा मातीच्या मूर्तीच्या रूपांत पूजिली जातात.
लिंगयोनिपूजा,नदीला महामाता मानून दिलेले पूज्यत्व, बैलांबद्दलचा आदर, वृक्षांचे पावित्र्य या बाबी सिंधू संस्कृतीत प्रामुख्याने आढळून येतात. वैदिकांनी या सर्वांचा स्वीकार केला. याचे प्रत्यन्तर ऋचांतून डोकावताना दिसते. असे मत म.म.पां.वा. काणे यांनी मांडले आहे. सुफलीकरणाशी संबंधित पुरुषदैवतांचे शोधन करताना हे मत लक्षात घेणे आवश्यक ठरते.
भुलोबा : भांगलोबा : शिराळशेठ -
नाग हा क्षेत्रपाळ मानला जातो. नागपंचमीस केली जाणारी नागपूजा सुफलीकरण विधीचाच एक भाग आहे. नागपंचमीची कथा शेतीशी निगडित आहे. नागपंचमी हा स्त्रियांचा सण आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात चौरस्त्यावर भुलोबा मांडला जातो. पुणे भागात त्याला शिराळशेट म्हणतात. चिखलाच्या चकत्या एकावर एक ठेवून लिंगाकार रूप देऊन त्याची पूजा केली जाते. त्या दिवशी अनेक ठिकाणी जत्रा भरते. तरुण सुवासिनी आणि कुमारिकांचा
पान:भूमी आणि स्त्री.pdf/५३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४८
भूमी आणि स्त्री