Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

Indologists, who have tented to view India and Hinduism through the prism of asceticism and themes of purity or pollution.'
 धुरपता -
 भूमातेच्या संहारक रूपाला आंध्रात वा महाराष्ट्राच्या काही भागांत धुरपता असे म्हणतात. ही देवी ग्रमादेवतेच्या स्वरूपात पूजली जाते. दक्षिण भारतात ज्या अष्टशक्ती मानल्या जातात त्यापैकी ही एक आहे. या देवीचे रूप विक्राळ असते. तिला मद्य मांसांचा नैवेद्य लागतो. या धुरपतेचा सबंध महाभारतातील द्रौपदीशी जोडला जातो. मराठवाड्यात इळा आवस शेतकरी समाजात विधिपूर्वक पाळली जाते. इळा आवसेच्या विधीत तुरांट्या वा धान्याच्या कडब्याची कोप करतात. त्यांत पाच दगडांना चुना लावून पांडव म्हणून स्थापन करतात. कोपीबाहेर दोन दगडमांडतात. त्यांना धुरपता उर्फ द्रौपदी आणि कुंती असे म्हणतात. पांड हे जमीन मोजण्याचे एक माप आहे. या अवसेला अंबिलीचा नैवेद्य लागतो. इळा आवसेच्या विधीचा विचार करताना त्या बाबत खोलात जाऊन विचार करता येईल. इळा म्हणजे पृथ्वी भूमाता भूमातेची सर्जन क्षमता वाढावी, तिच्या सुफल होण्याच्या प्रक्रियेस मारक असणारे घटक नष्ट व्हावेत यासाठी ही पूजा. घातक घटकांचा संहार करणारी दैवी धुरापदा. मराठी ओव्यांत धुरपदा भेटते. मराठवाडा, महाराष्ट्रात श्रद्धेने ठेवले जाणारे हे स्त्रीचे नाव आहे.
 काही देवता रानातच राहणाऱ्या -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी या हेतूने केल्या जाणाऱ्या सण व्रतवैकल्ये, उत्सव यांच्याशी संबंधित देवतांचा विचार करताना एक बाब लक्षात येते की, काही देवता गावात येत नाहीत. त्यांचे स्थान रानात, झाडाखालीच असते. त्या अनघड देवता असतात. त्यांचे मूर्तिरूप सहसा सापडत नाही. त्या दगड, वारूळ, झाड या रूपांत असतात. त्यांचे रूपवर्णन करता येत नाही. त्या स्वयंभू असतात. मानवनिर्मित नसतात. पारधी कैकाडी जमातीतील सात देवता रानात राहणाऱ्या असतात. त्या गावात येत नाहीत. लोककथांतून क्षेत्रदेवता, वनदेवता, पाण्याच्या जवळ राहणाऱ्या आसरा यांचे संदर्भ येतात. मरी आई, यल्लमा या मातृका लहान मुलांच्या संरक्षणासाठी पूजिल्या जातात. त्यांच्या नावे दगड असतात. त्यांची वस्ती वृक्षाखाली असते. तेलंगणात चिंचेच्या, तामिळनाडूत आंब्याच्या, तर महाराष्ट्रात बाभळीखाली त्यांचा निवास असतो.या देवता लावलेल्या झाडाखाली राहत नाहीत तर आपोआप

४६
भूमी आणि स्त्री