Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रद्धा आहे. अप्सरा पासून आसरा हा शब्द तयार झाला असावा. या कुमारिका असतात. तसेच विघ्नकर्त्या असतात. त्यांना संतुष्ट ठेवले तर त्या विघ्ने हरण करतात आणि धनधान्य पशु आदींची समृद्धी देतात असा समज आहे. शंकराच्या वराने सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या व त्या सिद्धीने मातलेल्या, आंधकासुरला ठार मारण्यासाठी १९० मातृका निर्माण केल्या. पण तरीही त्याचा नाश झाला नाही. म्हणून विष्णूने शुष्क देवता नावाची मातृका निर्माण केली. तिने अंधकाच्या शरीरात घुसून त्याचे रक्त प्राशन करून त्याला ठार मारले. नंतर या मातृका दिसेल त्या माणसाचे रक्त पिऊ लागल्या. नंतर शिव आणि विष्णु यांनी दुसऱ्या अघोर मातृका पाठवून त्यांचा नाश केला. तेंव्हापासून त्या मातृका रानावनात शेता भातात राहतात अशी आख्यायिका आहे. ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोगपडू नये म्हणून त्यांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.
 आसरा या पाण्याजवळ राहतात. त्यांना 'सात आसरा' वा 'सात माऊल्या' असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे असा समज आहे की त्या पिशाच्च योनीतील असून ते स्त्रियांचे अतृप्त आत्मे असतात. अजूनही मराठवाड्यातील ग्रामीण भागात असा समज आहे की नदीत, विहिरीत वा डोहात आसरा राहतात. त्या ठिकाणी जीव दिलेल्या स्त्रियांचे ते पिशाच्च असते. त्यांना 'पऱ्या' असेही म्हणले जाते. या तीन नावांतून त्यांच्यातील 'यातुसामर्थ्य' व्यक्त होते. त्या त्या भागात, त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या आसरांची पूजा केली जाते. फार मोठ्या यात्रा भरविल्या जात नाहीत. अर्थात काही अपवाद असतात. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नेरखेड खेड्याजवळच्या जीवराखी नदीत असलेल्या सकल डोहातील आसरांची यात्रा भरते. औरंगाबादजवळील कचनेर येथे विहिरीतील आसरांची यात्रा भरते. प्रत्येक नदीच्या नावाने एक देवी मानली जाते. जणू नदी हीच देवी मग ती चन्द्रभागा असो, कृष्णा असो वा गोदावरी असो. या देवींच्या नावाने यात्रा भरतात. महाराष्ट्रातील नद्यांचे धार्मिक माहात्म्य या विषयाच्या अभ्यासक १३ॲने फेल्डहाऊस, नोंदवतात, 'Rivers in India are commonly associated with certain worldly religious values - wealth, beauty, long life, good health, food, love and the birth of children. Represented by such goddesses as श्री, लक्ष्मी and जया, these values often find expression in feminine immagery. However, such 'domestic' ideals have been relatively neglected by

भूमी आणि स्त्री
४५