Who is the mother of fertility.... There can be no question that they held a pre-eminent position among the national deities, of non Aryan population'.
भूमीच्या सुफलीकरणाशी निगडित व्रते, सण, उत्सव, विधी यांचा अभ्यास करताना वरील विधानाची यथार्थता प्रत्ययाला येते. या संदर्भात भारतीय लोकसंस्कृतीचे मान्यवर अभ्यासक देवीप्रसाद चटर्जी२ म्हणतात -
More significant is the fact that among the vast masses of the Indian peasantry - that is among those that are no longer living in the tribal society male deities have only secondary position. The deities that have only real grip on the lives of the masses are mostly females... Survival of the tribal past has indeed been an important characteristics of the traditional Indian society.
लोक परंपरांच्या वरील दोन्ही ही अभ्यासकांची मते अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची आहेत. सुफलीकरणाशी संबंधित विधीव्रतांचा अभ्यास करताना वरील विधानांची यथार्थता सतत जाणवते.
अन्न : आदिमानवाची समस्या आणि प्रेरणा -
धान्यबीज पेरल्यापासून ते कणसातील बीज पक्व होईपर्यंत त्या बीजावर कोणकोणत्या प्रक्रिया होतात याचे कुतूहल आदिम मानवी मनाला जरूर होते. परंतु त्यातील कार्यकारणभाव उलगडून पाहण्याची झेप मानवी बुद्धीने घेतलेली नव्हती. जमीन, पाणी, सूर्य, बीज यांच्यातील अनुक्रमात्मक अनुबंध त्याच्या मनासमोर उलगडलेला नव्हता. अशा काळात मानवी मनाचा भरवसा मंत्र तंत्र सामर्थ्यावर विशेष करून होता. भोवतालच्या वास्तवावर पकड मिळविण्यासाठी समूहमनाची शक्ती, माध्यम म्हणून आदिमानवाने स्वीकारली. समूहमनाची शक्ती, विश्वात्मक यातुशक्ती आपल्या देह माध्यमातून कृतिशील करणे आणि इष्ट सिद्धी घडवून आणणे यावर आदिमानवाची श्रद्धा होती. यातूनच सर्व यातुविधी निर्माण झाले. अन्न ही आदिमानवाची महत्त्वाची समस्या व प्रेरणा असल्यामुळे आदिम काळातील यातुविधी कृषी विधानाशी जोडलेले आहेत.
पान:भूमी आणि स्त्री.pdf/३८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
३३