पान:भूमी आणि स्त्री.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकार केला. 'समन्वय आणि स्वीकारातून समरसत्व',याचे अद्वितीय उदाहरण म्हणजे भारतीय संस्कृती. विविध टोळ्यांचा संघर्ष जरूर झाला, रक्ताचे पाट वाहिले पण त्यातून समन्वय झाला. पस्परांनी एकमेकांना स्वीकारले, रोटी बेटी व्यवहार झाले आणि एक समिश्र इंद्रधनुषी संस्कृती सतत आकारत गेली. आज मात्र धर्म पंथाच्या नावाने माणसामाणसांत दुही माजवली जात आहे. धर्माच्या, पंथाच्या, नावाने रक्ताचे पाट वाहत आहेत. अशा वेळी भारतातील सांस्कृतिक एकात्मतेमागील विविध कारणांचा शोध घ्यावा. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरांमागची कृतिशील भूमिका शोधावी हा एक हेतू शोधनाच्या मागे आहेच. ही एकात्मता विधी, व्रते, उत्सवांशी संबंधित गीतांतून, प्रतिमांतून, कृतीतून, त्यामागील धारणांतून व्यक्त होते. या शोधनाला त्यांचा आधार आहे.

भूमी आणि स्त्री
३१