Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १६. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ.८०
 १७. कै. वि.का.राजवाडे : भारत इतिहास संशोधक मंडळ - इतिवृत्त शके १८८५
 १८. अनंत आबाजी देवधर : हादगा उर्फ बोंडला - भोंडला-टिपण(महाराष्ट्र लोकसाहित्यमाला भाग २२ -भोंडला भुलाबाई)
 १९. डॉ. मधुकर वाकोडे : हनुमंताची निळी घोडी - टिपण (महाराष्ट्र लोकसाहित्यमाला भाग २२)
 २०.साँझी - स्त्रिया आणि कारले यांच्यातील नाते. विवाहविधीत मुलाच्या आईस कारल्याच्या मांडवाखालून नेण्याचा विधी महत्त्वाचा मानतात. भुलाबाई भोंडल्याच्या गाण्यात 'कारल्याचे बी पेरले ग सई' हे गाणे आहे. कारले सदाहरिततेचे, सुफलतेचे प्रतीक आहे. डांग, गुजराथ, माळवा परिसरातील आदिवासी कुमारिकाही 'साँझी' व्रत करतात. त्यातील एक गाणे, ज्यात कारल्याचा संदर्भ आहे.

संजा तू बडा बाप की बेटी
तू खाए खाजा-रोटी
तू पैरे माणिक-मोती
संजा एवडो हो
साथे बेवडो हो (पाण्याची घागर)
थारा डावा हाथ करेलो हो
थारा जीमण हाथ हो
थारा चोटी लोहरिया हो!


प्रकरण ५ वे
 काही खेळगाण्यांचा शोध : भोंडला, भूलाबाई -
 १.

'मांड मांडणे' हा वाक्प्रचार मराठीत प्रचलित आहे. राजस्थानात सणाच्या निमित्ताने विशिष्ट प्रकारच्या शुभकारक आकृती, अंगणात, घरात चुनखडी आणि काव यांच्या सहाय्याने काढतात. 'मांड' साधारणपणे निसर्ग आणि जीवनाचे कलात्मक रेखाटन असते. याला

३१६
भूमी आणि स्त्री