Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भय वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्राचीन भारतीय समाज एकसंघ कसा राहिला याचा उलगडा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून होतो. प्रस्तुत शोधनिबंधात ही भूमिका घेऊन सुफलीकरणाशी निगडित विधिउत्सवांचा आणि तत्संबंधी गाण्यांचा अभ्यास मांडला आहे. भारतीय एकात्म सांस्कृतिक जीवनाच्या एका पैलूचा हा अभ्यास आहे. इतर पैलूंच्या अभ्यसातून भारतातील एकात्म लोकसंस्कृतीच्या मुळाशी असलेल्या प्रेरक तत्त्वांचा शोध घेऊन भविष्याच्या दिशा शोधता येतील. त्या दृष्टीने लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा अभ्यास केवळ महत्त्वाचा नाही तर आवश्यक आहे हे स्पष्ट होते.

भूमी आणि स्त्री
३०५