मनस्विनी' कसे करता येईल, तिच्यातील आत्मभान जागे करून तिला आत्मसिद्ध कसे करता येईल, याची दिशा शोधावी ही प्रेरणा या अभ्यासामागे होती.
भूमीच्या सुफलतेशी जोडलेल्या भारतभरच्या विधी, उत्सवांतून विलक्षण एकात्मता आहे. ती अंगभूत आहे. तिचे मूलबंध धर्माशी जोडलेले नाहीत तर माणसाच्या जगण्याशी, परंपरेने संचित केलेल्या जीवनरहाटीशी जोडलेले आहेत. भारतातील लोकमन माती, नद्या, हरितसृष्टी, निसर्गातील चढउतार यांच्याशी एकरूप झालेले आहेत. येथील माणसे
सर्वेपि सुखिनः सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु ।
मा कश्चित् दुःखभाग् भवेत ॥
ही भूमिका घेऊन जगणारी आहेत. 'सं' 'सर्वे' या शब्दातूंन व्यक्त होणारी 'समूहजीवना' ची भावना हीच 'राष्ट्र' संकल्पना नव्हे का ?
. भारतातील विधी, उत्सव रूढार्थाने धार्मिक नाहीत. ते लोकपरंपरांशी जोडलेले आहेत. भारतातील 'धर्म' ही संकल्पना संस्कृतिवाचक आहे. Religion या अर्थाने ती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेल्या जीवन धारणांशी ती जोडलेली आहे. 'रिलिजन' ही संकल्पना मात्र उपासनापद्धती, संप्रदाय, पंथ यांच्याशी निगडित आहे. 'हिंदू' हा शब्द जीवनरहाटी, जीवनपद्धती दर्शवितो. या जीवनरहाटीनुसार जगणाऱ्या विविध पंथांच्या संप्रदायांच्या लोकांच्या जीवनधारणा एकच आहेत. इतिहास असे दर्शवितो की शैव, वैष्णव, वारकरी, महानुभाव यांच्यात तीव्र मतभेद झाले, तरी ते सर्व एकाच जीवनधारेत, सांस्कृतिक परंपरेत, 'हिंदू' या संकल्पनेत समाविष्ट होतात. गेल्या शंभरवर्षांत ही संकल्पना अधिक विशाल होऊन 'भारतीय' या संकल्पनेत परिवर्तित झाली आहे.
लोकसंस्कृतीचा अभ्यास केवळ सजीव अवशेषांचा अभ्यास नाही किंवा मृत पारंपरिकबाबींची चिकित्सा नाही. या अभ्यासाला कार्यात्मक मूल्य आहे. त्यातून भविष्याला चेतना व प्रेरणा मिळते. आज धर्मभेद , भाषाभेद, जातिभेद, लिंगभेद अधिक टोकदार होऊन त्यांद्वारे, भारतीय समाजाचे विघटन होईल की काय असे