पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकसाहित्याच्या अध्ययनाचा पाया इ.स. १८६८ मध्ये मेरी फ्रिअर या लेखिकेने 'ओल्ड डेक्कन डेज' या नावाने लोककथांचे संकलन करून घातला. १८८० मध्ये मिस् स्टोक्स हिने अयोध्या प्रान्तातील लोककथा प्रसिद्ध केल्या. भारतीय लोकजीवनाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून १८८६ मध्ये बॉम्बे ॲन्थ्रॉपॉलॉजिकल सोसयटीची स्थापना झाली.
 आज जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज लोकसाहित्याचा अभ्यास एक स्वतंत्र अभ्यास-शाखा म्हणून होत आहे. लोकसाहित्याचा विविध अभ्यासशाखांशी जसे मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान; मानववंशशास्त्र आदींशी कोणता अनुबंध आहे याचा शोध घेतला जात आहे. लोकसाहित्य ही अभ्यासशाखा एकेरी , एकांगी न राहाता ती समृद्ध आणि संपृक्त होत आहे.
 व्रतांमध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा असतो, व्रते ही स्त्रियांचीच असतात. वर्षाच्या बारा महिन्यांतील व्रते आज धर्माशी जोडलेली असली तरी त्यांची मुळे कोणत्या कामनेशी, भूमिकेशी गुंतलेली आहेत, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रबंधाद्वारे केला आहे. आमची लोकभूमी समृद्ध आहे. ती जेवढी खणाल तेवढे मूलधन हाती लागते. त्यातून आजच्या जीवनाचे प्रेरणास्रोत हाती लागतात.
 ही व्रते, विधी, तत्संबंधी उत्सव जमिनीच्या सुफलीकरणाशी निगडित आहेत. या. विधी, व्रतोत्सवांचे मूलबंध भूमीची सुफलता वाढून मानवी जीवनास अत्यावश्यक अशा अन्नाची आणि श्रमासाठी आवश्यक अशा माणसांची समृद्धी वाढावी या कामनेशी जोडलेले आहेत. भूमी आणि अन्ननिर्मिती यांच्याशी निगडित परंपरा कृषिजीवनात खोलवर रुजलेल्या आहेत. त्या माणसाच्या जगण्याशी जोडलेल्या असल्याने मानवी विकासक्रमात वा कलौघात त्यांत फारसे बदल झाले नाहीत. काळानुरूप विधींचे व्रतांत उन्नयन झाले. त्यांच्या स्वरूपात बदल झाले. परंतु हजारो वर्षांपूर्वीचे मूलबंध कायम आहेत.
 भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जन-सामर्थ्याने भारावलेल्या आदिमानवाने त्यांच्यातील साधर्म्य मनात नोंदवले. त्यातूनच भूमीची सुफलनता वाढविण्यासाठीच्या विधिउत्सवांतून स्त्री-प्रधानता आली. आदिदेवता ही स्त्रीरूपी आहे. निर्मितीचे मूलस्थान मूलस्थान असणारी 'योनी' आदिमानवाने पूजनीय

३०२
भूमी आणि स्त्री