सचेत करायचे असेल तर या सुफलीकरणाशी निगडित विधिउत्सवांच्या, त्यामागील स्त्रीच्या समर्थ अस्तित्वाच्या खुणांचा शोध घ्यायला हवा' या विधिउत्सवांच्या गाभ्यातली स्त्रीच्या मानसिक, शारीरिक, कृषिप्रधान सामर्थ्याची ओळख समाजाला करून द्यायला हवी. त्यातून स्त्रियांच्यातील आत्मविश्वास जागा करता येऊ शकतो. आदिकाळात, त्यानंतरही त्यांनी बजावलेल्या समाज कुटुंबातील महत्त्वाच्या भूमिकेची ओळख करून देऊन समाजात त्यांच्याविषयी नवी दृष्टी निर्माण करता येऊ शकते. सुफलीकरण विधिउत्सवांतील 'स्त्रीप्रधानता' तत्कालीन समाजातील स्त्रीच्या आर्थिक, समाजिक संघटनातील समर्थ भूमिकेतून आलेली आहे. या भूमिकेचे स्वरूप सर्वसामान्य स्त्रीपर्यंत आणि समाजापर्यंत विसाव्या शतकातील 'सामाजिक न्यायाच्या' विचारमुशीतून नेऊन पोहोचविले तर एकविसाव्या शतकात प्रवेश करणारी भारतीय स्त्री सबल, सुजाण होऊ शकेल आणि भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेची वीण अधिक सधन आणि घट्ट होईल.
पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३००
भूमी आणि स्त्री