पान:भूमी आणि स्त्री.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रांगोळ्या आणि स्त्री यांच्या अतूट नात्याबद्दलची चर्चाही यापूर्वी केली आहे. रांगोळी न येणारी स्त्री शोधून सापडणार नाही. रांगोळी हा शुभकारक यंत्राचाच एक भाग आहे.

 तंत्रशास्त्राला अनुरूप काढलेली श्रीयंत्राची आकृती स्त्री योनीचे प्रतीक आहे. या संदर्भात देवीप्रसाद चटोपाध्याय१९ लिहितात -
 "We may easily see the significance of Purna Ghata, being placed on the sarvabhadra mandalam. Plants and fruits are brought into contact with the female reproductive organ. The same idea is repeated in the Purna Ghata itself. The vessel is the female womb, that this womb is with a baby is indicated by the picture of sindur puptali. It is thus an enactment of human reproduction .. But why this enactment of human reproduction? Obivously to ensure the multiplication of the

भूमी आणि स्त्री
२९७