पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुले अधिक तिच्याकडून पेरणीस सुरुवात करायची ही प्रथा आजही शेतकरी समाजात आहे.
 A fruitful woman makes plants fruitful, a barren woman makes them barren.
 भूमी आणि स्त्री यांच्यातील साधर्म्य साहचर्यातून अनेक परंपरा निर्माण झाल्या आहेत. मूल जन्माला आले की आजही ते जमिनीवर ठेवतात. खेड्यात ही प्रथा आहे. संस्कृतमध्ये 'अपत्य संभव' या शब्दासाठी 'भूमिस्थ' असा शब्द आहे. बिफ्रॉं म्हणतो -
 The fecundity of the earth and the fecundity of women viewed as being one and the same quality.
 कालप्रवाहात स्त्री ओझे व देहस्विनी बनली -
 संस्कृतीच्या विकास क्रमात स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था नाहीशी होऊन पुरुषकेन्द्री समाजव्यवस्था काही अपवाद वगळता सर्वत्र आली. केरळातील नायर समाज वरवर पाहता मातृसत्ताक राहिला तरी थरवाडातील सर्व महत्त्वाचे व्यवहार भाऊ पाहू लागला. पुरुषकेन्द्री समाज व्यवस्था आली, स्त्रीचा समाजिक दर्जा दुय्यम, बिनमहत्त्वाचा झाला, हुंडा पद्धतीमुळे ती कुटुंबातले 'ओझे' झाली, आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष अर्थकारणातील सहभाग संपला. त्यातून अनेक कुप्रथा निर्माण झाल्या. उदा. राजस्थानात मुलगी झाली की तिला चांदीच्या बादलीत दूध ठेवून त्यात नवजात बालिकेला बुडवून ठार मारीत. तिचा देह मातेच्याच खाटेखाली पुरत. तिने पुढील जन्म मुलाचा घ्यावा ही अपेक्षा. अशा प्रकाराला 'दूधमुही' म्हणतात. राजस्थानात अशा मातेला मी भेटले आहे. तर तामिळनाडूत उसलामपट्टी जिल्ह्यातील कल्लार समाजात मुलगी जन्मताच तिला ठार मारण्याची प्रथा आहे. फक्त एक मुलगी जिवंत ठेवतात. आईने मुलगी ठार मारण्यास विरोध केला तर तिला नवरा टाकून देतो. मुलगा व्हावा म्हणून नाजूक अंगाला सुई टोचण्याचा विधी स्त्रियांना करवून घ्यावा लागतो. महाराष्ट्रातील लोककथांत बाई बाळंत झाली की 'तुला मुसळच झाले', 'तुला कुंचा झाला' असे सांगितल्याचे

२९४
भूमी आणि स्त्री