महत्त्वाच्या दोन गरजा होत्या. त्या म्हणजे अन्न आणि संतती. आज जग एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना शेती आणि यातुसाधना यांचा संबंध इतका निकटचा होता यावर जगाचा विश्वास बसणे कठीण आहे. परंतु हजारो वर्षांपूर्वी धान्य निर्मितीची प्रक्रिया मानवास अवगत नव्हती. जीवन जगण्यासाठी विपुल धान्य निर्माण होणे आवश्यक होते. अर्थातच त्याकाळात धान्यनिर्मितीची क्रिया मंत्रतंत्रावर अवलंबून असते अशी आदिमानवाची श्रद्धा होती. आजही वन्य समाजात या श्रद्धेला धार्मिक माहात्म्य आले आहे. डहाणू भागातील वारली समाजात पेरणीच्या वेळी सर्व गाव एकत्र जमते. पेरणी करावयाच्या भातावर - साळीवर देवाला बळी दिलेल्या कोम्बड्याचे रक्त शिंपडतात व नंतरच पेरणी करतात. पेरलेल्या साळीचे तांदूळ घरात येईपर्यंत मटन, कोंबडी अंडी जूनच्या पावसानंतर येणारी फळे घरातील प्रमुख पुरुष आणि त्याची पत्नी खात नाहीत. तसेच हे दोघे जुना तांदूळ खातात. नासिक भागातील ठाकर लोक पेरणीपूर्वी भूमीला कोम्बड्याचा बळी देतात. धान्य हाती आल्यावर प्रत्येक जण आपापल्या शेतातील भाताची एकेक पेंढी एकत्र करतात. त्यावर बळीचे रक्त शिंपडतात. सायंकाळी त्या पेंढ्यातील नव्या तांदळाचा भात शिजवून सर्व गाव एकत्र जेवण करते. वन्य जमातीत पेरणी कापणीच्या काळात जे यातुविधी केले जातात ते आजही केले जातात, त्यांना हजारो वर्षांची वेदपूर्वकाळापासूनची परंपरा आहे.
वैदिक आर्य भारतात आले आणि येथे स्थिर होताना त्यांनी कृषिविषयक मंत्रतंत्र विधी स्वीकारले. अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता यात शेतीचे मंत्र आहेत. ऋग्वेदातही मंत्र आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात शेतीची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यास सीताध्यक्ष म्हटले जाई. सूत्र वाङ्मयात तर शेतीच्या अनेक देवतांचा उल्लेख आहे. वैदिक आर्य मुळात गोपालक होते. मंत्रातंत्राची त्यांना गरज भासली नाही. भारतात आल्यावर त्यांनी कृषिव्यवसायाचा स्वीकार करून मंत्रतंत्रही उन्नयित स्वरूपात स्वीकारले. त्याची मीमांसा करताना थॉमसन१५ लिहितो -
So long as they have pasture, cattle feed and breed of themselves but by comparison with cattle raising the works of tilling, sowing and reaping is now ardous and uncertain. It requires patience, foresight, faith. Accordingly agricultural
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२८७