पान:भूमी आणि स्त्री.pdf/२९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतीकात्मकता सुस्पष्ट आहे. स्त्री ही भूमीरुप असून कुंभरूपी मेघांतून तिच्यावर जलवृष्टी होते. त्यातून तिच्या देहावर वनस्पती उगवल्या आहेत अशी या यातुविधीमागची कल्पना आहे. ही अनुकरणात्मक यातुविधीची कल्पना आहे. १८७४ मध्ये गोरखपूरला प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यावेळी या यातुविधीचा अवलंब केल्याची नोंद आहे. गर्भवती स्त्रीला केळीच्या झाडाखाली आंघोळ घातल्यास तिला बाळंत होण्यास त्रास होत नाही. निपुत्रिक स्त्री उघड्यावर पावसात आकंठ भिजल्यास तिला गर्भधारणा होते अशी महाराष्ट्रात, भारतात समजूत आहे. बाणभट्टाच्या हर्षचरित्रातील राणी विलासवती पुत्रप्राप्तीसाठी यंत्रपूजा करून चौकात नग्न स्नान करते असा विधी आहे. तिने केलेले स्नान तंत्रसाधनेचा एक भाग आहे हे लक्षात घेतल्यास, देवी उपासक तांत्रिकाचा वामाचार विधी भूमीच्या वा स्त्रीच्या सुफलन विधीचा एक भाग आहे हे लक्षात येते. अशा तऱ्हेच्या श्रद्धा जगभर होत्या. विशेष करून आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, भारत येथील यातुश्रद्धांत खूप साम्य आहे.
 १४Bushmen women and girls are careful to take shelter during a shower, for the rain from heaven which fertilises the earth would impregnate them also. Hottenlot women believe that it would be impossible for them to have any children unless they had first stood naked in a thunder shower.. Australian women likewise believe that they can be impregnated by the rain. A mongol princess conceived through the operation of hail storm.
 या परिच्छेदातील मंगोल राजकन्या आणि राणी विलासवती एकाच परंपरेतील आहेत.
 कृषियातुविज्ञान : पुरातन परंपरा -
 स्त्री आणि भूमी यांच्या साधर्म्यातून कृषियातुविज्ञान (Agri-magic) निर्माण झाले. मानवी संस्कृतीच्या इतिहासातील फार मोठा कालखंड कृषियातुविज्ञानाने व्यापलेला आहे. यातूनच मातृसत्ता, मातृदेवता, सुफलीकरण विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानता यांच्यातील आंतरिक संबंधांवर प्रकाश टाकता येईल. आदिमानवाच्या

२८६
भूमी आणि स्त्री