पुरुषदेव निर्माण केले. प्रारंभीच्या निर्मितीसाठी तिला पुरुषाची गरज वाटली नाही. नंतर तिने शिवाला प्रियकर म्हणून स्वीकारले, या दोहोंच्या शिवशक्ती संयोगातून विश्व निर्माण झाले. ती जगन्माता बनली. हीच कल्पना मध्य आशियातील मातृदेवतांच्या निर्मितीमागे आहे. प्रथमतः देवी एकटी असते. आत्मदेहापासून ती जोडीदार निर्माण करते. त्यांच्याशी संयोग करून विश्वनिर्मिती करते. मध्य आशियात इसिसहोरस (इजिप्त), अंस्टॅरॉथटॅमझ (फोएनिशिया), सिबिलअँटिस (आशिया मायनर), व्हीआझ्युअस (ग्रीस) अशा नावांनी जगन्मातापितरे ओळखली जातात. मध्य आशियातील मातृसंप्रदायात, भारतातील देवीउपासना, देवदासी संप्रदाय, स्त्रीमाहात्म्य, स्त्रीपुजारिणी ही देवीसंप्रदायाची वैशिष्ट्ये होती. या संदर्भात रामाप्रसाद चंदा यांनी १९१६ मध्ये असे अनुमान काढले की मध्य आशियातील देवीसंप्रदाय ज्या प्रमाणे मातृसत्ताक समाज व्यवस्थेत निर्माण झाला. तद्वत भारतातील देवीसंप्रदाय मातृप्रधान समाज व्यवस्थेत बहुधा निर्माण झाला असावा.
'The Shakta conception of Devi, as Adya Sakti, the promordial energy and Jagadamba, the mother of the Univerce also very probabaly are in a society where matrichate or motherkin was prevalent.'
मध्य आशियातील देवीसंप्रदाय आणि मातृसत्ताक समाजव्यवस्थेचा आंतरिक संबंध दाखविताना श्री. चंदानी, प्रो. पॅटॉन१२ यांच्या विधानाचा आधार दिला आहे. अरबी वाळवंटातील ओॲसिस भागात मातृसत्ताक टोळ्या राहत. त्या संदर्भात प्रो. पॅटॉन म्हणतात -
There is a large body of evidence to show that the semites before their separation passed through a matriarchal stage of society. The tribe was a group of people inhabiting in the particular oasis in the Arabian desert. It was made up of mothers, their brorthers and children. Fathers were men of other tribes in other oasis, who contracted only temporary
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२८३