Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुमान काढावे लागते की, वैदिक श्रद्धांची भूपृष्ठाखालची जमीन धार्मिक दृष्टिकोनातून तयार झालेली नव्हती तर मांत्रिकांच्या यातुप्रधान दृष्टिकोनातून तयार झालेली होती.'
 योनिपूजा हीच विश्वजननीची पूजा -
 आदिमानवाला निर्मिती-पुननिर्मिती या घटनांबद्दल गूढ आकर्षण होते. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनतेचे सामर्थ्य त्याने अनुभवलेले होते. दैनंदिन जगण्याला आवश्यक अशा गरजांची परिपूर्ती स्त्री आणि भूमी यांच्याकडूनच होते. हे लक्षात येताच त्याची ठाम समजूत झाली की या दोहोंत काही तरी अनाकलनीय जादू आहे. 'असुशक्ती' आहे. यातु सामर्थ्य आहे. या शक्तींद्वारे भूमीतून वनस्पतींचे सर्जन होते व स्त्री माणसाला जन्म देते. या साधर्म्यातून त्याने विश्वजननीची मातृदेवतेची कल्पना केली असावी. स्त्रीप्रमाणे विश्वाला जन्म देणाऱ्या जगन्मातेची योनी हे सर्जनाचे-निर्मितीचे केन्द्र कल्पून आदिमानवाने योनिपूजा११ हीच विश्वजननीची पूजा हा संकेत निश्चित केला.
 अंबुवाची उत्सव असामात अत्यन्त थाटात साजरा होतो. त्या ठिकाणी सतीची योनी गळून पडली असे मानले जाते. भारतात उपलब्ध झालेल्या योनिशिल्पांच्या आधारे निश्चित अनुमान काढता येते की, एकेकाळी सर्व केन्द्रांत देवीची उपासना होत असावी. भारतात वैदिक आर्य येण्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणावर आद्यशक्तीची यात्वात्मक विधींनी पूजा केली जात असावी. निषाद, शबर या पारधजीवी जमातीतही देवीपूजा होती. मात्र वैदिक आर्यांना ती पूर्णपणे अज्ञात होती.
 देवीपूजा आणि मातृसत्ताक समाज यातील आंतरिक अनुबंध -
 मोहंजोदारो हरप्पाचे उत्खनन झाल्यानंतर भारतीय संस्कृतीचे अनेक दुवे हाती आले तो पर्यंत भारतातील मातृदेवतेची उपासना भारताबाहेरून आली असे मानले जाई. मध्य आशियातील मेसोपोटेमिया, इराक, सीरिया इ. देशांत अतिप्राचीन काळापासून ती होती. ज्या सामाजिक संघटनेत पुरुषप्रधानता असते तिथे मातृदेवतांचा विकास होणे शक्य नाही. हे मत सिंधू संस्कृतीच्या उत्खननापूर्वीच आर.पी. चंदा या मानववंशशास्त्रज्ञांनी व्यक्त केले होते. शाक्त कल्पनेनुसार विश्वाचे आदितत्त्व प्रकृती आहे. सर्जनाची इच्छा होताच तिने ब्रह्मा, विष्णु, महेश हे तीन

२८२
भूमी आणि स्त्री