पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गौरव ऋषींनी केला आहे. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात तिचे गौरवपूर्ण वर्णन आहे. ती स्वतःबद्दल म्हणते "मी मित्रवरुणांना धारण करणारी आहे. इंद्र, अग्नी, अश्विनी देव यांची मी धात्री आहे. मी विश्वावर अधिसत्ता चालविणारी, सर्वांना धन देणारी, ज्ञानसंपन्न, यज्ञीय देवतात श्रेष्ठ मीच आहे' मात्र या संदर्भात डॉ. स. रा. गाडगीळ एक महत्त्वाची बाब लक्षात आणून देतात की, या अंभृणीची ऋग्वेदात स्तुती केली पण तिला एकदाही यज्ञीय आहुती दिलेली नाही. वैदिक आर्य आपल्या मूळ निवासस्थानाकडून भारताच्या दिशेने येत असताना मध्य आशियातील स्त्रीप्रधान संस्कृतीशी त्यांचा संबंध आला असावा किंवा भारतात आल्यानंतर ही आर्यपूर्वांची देवता त्यांनी आपल्या दैवत विकल्पनात समाविष्ट करून घेतली असावी. आर्य उत्तरेकडून आले. त्यावेळी पंजाबसिंध भागात कृषि संस्कृती अस्तित्त्वात होती. कृषि संस्कृती आणि मातृदेवता यांच्यातील संबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. ऋग्वेदात भारतातील असुरांबद्दल उल्लेख आहेत. ते शिवपूजक आहेत असाही उल्लेख आहे आणि शिवपूजा लिंग स्वरूपात होते. जिथे लिंगपूजा तिथे योनिपूजा असतेच.
 वैदिक श्रद्धांच्या भूपृष्ठाखालची जमीन -
 गीतेच्या १६ व्या अध्यायात म्हटले आहे की, असुरांच्या मते ही सृष्टी, 'विश्वदेखील स्त्रीपुरुष संयोगातून निर्माण झाले आहे. तसेच कामोपभोग हे जीवन सर्वस्व मानून असुरांचे एकूण आचरण असते. रावण हा असुर होता. तो शिवपूजक होता. विष्णु ही देवता जी वैदिकांची आहे. तिची मंदिरे अवतारांच्या स्वरूपात, विठ्ठल, रामकृष्ण आदी या रूपात दिसतात. शिव मात्र लोकदेवतेच्या विविध रूपांत बहुजन समाजात पूजिला जातो. तंत्रग्रंथ उत्तरकालीन असले तरी तंत्रसाधना अतिप्राचीन आहे. या साधनेत स्त्रीपूजेला महत्त्व आहे. काही ग्रंथांत शिव आणि शक्ती यांच्या संयोगाचे , स्त्रीपुरुष यांच्या संयोगाची असलेले साधर्म्य तपशीलवार वर्णिले आहे. तसेच प्रकृती पुरुष यांच्या विश्वात्मक कामक्रीडेशी (Cosmiclust) सद्भाव साधण्यासाठी वामाचार विधी सांगितले आहेत. भारतातील अनेक देवीपीठांत देवीची योनिशिल्पाच्या रूपात पूजा होते. लिंग, योनिपूजा करणाऱ्या शैव, शाक्त संप्रदायाची मुळे आर्यपूर्व समाजात आहेत. या संदर्भात भारतीय तत्त्वज्ञानाचे थोर अभ्यासक १०देवीप्रसाद चटोपाध्याय लिहितात, 'आपल्याला

भूमी आणि स्त्री
२८१