पान:भूमी आणि स्त्री.pdf/२८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकात्म गणसमाजाचे विघटन होऊन नवा वर्गीय समाज निर्माण झाला. कारण उत्पादनात वाढ होत गेली. बौद्धिक आणि अध्यात्मिक कर्म व श्रम यात विभागणी झाली. एका वर्गाला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्याच्या दृष्टीने दुसऱ्या वर्गाकडून नवी नवी साधने निर्माण केली गेली. त्यातून वर्गीय समाज घडत गेला. सामूहिक श्रमकर्माची आवश्यकता भासेनाशी झाली. त्यातून वर्गीय समाज घडत गेला. आणि या अर्थानेच भारताचा इतिहास हा संकराचा इतिहास आहे. एकात्म संस्कृतीचे एक कारण हा संकर आहे. या 'संकर' प्रक्रियेचे वर्णन, सामाजिक स्थित्यंतरांचे संकेत धर्मसूत्रात आलेल्या संकरित जातींच्या उल्लेखांमधून मिळतात. हे संकेत जाणून घेण्याअगोदर एक महत्त्वाची बाब, जी सर्वमान्य आहे ती लक्षात घेतली पाहिजे. गणसमाज मातृसत्ताक होता. कृषिप्रधान जीवनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक स्त्री होती. कारण शेती, तिची मशागत करण्याच्या पद्धती, अन्न टिकवणे व शिजवणे या कृषिसंबंधित गोष्टींचा शोध स्त्रीने लावला होता. कृषि उत्पादनात ती प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या ती समाजाचा एक महत्त्वाचा घटक होती. गणसमाजाचे विघटन होऊन वर्गीय समाजाकडे तसेच मातृसत्ताक जीवन पद्धतीकडून पितृसत्ताक जीवनपद्धतीकडे वाटचाल सुरू झाली. या आर्थिक, समाजिक बदलाच्या स्थित्यंतरांच्या काळात, संकरातून विविध जातींची उत्पत्ती झाली.
 प्रतिलोम विवाह : शूद्र जातीत गणना -
 सर्व धर्मसूत्रांनी सांगितलेल्या एकेचाळीस संकरित जातींची यादी श्री. बॅनर्जी यांनी दिली आहे. त्यातील काही अशा -

 उदा.

जात  = पुरुष  + स्त्री
रथकार  = क्षत्रिय  + ब्राह्मण
चर्मकार  = विदेहक  + बाह्मण
निषाद  = वैश्य वा शूद्र  + ब्राह्मण
धीवर (मासेमार)  = वैश्य  + क्षेत्रीय
कर्मकार  = मगध  + क्षत्रिय
नाविक  = अंबस्थ  + ब्राह्मण
भूमी आणि स्त्री
२७५