Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 भारतीय एकात्मतेस लोकपरंपरांचे महत्त्वाचे योगदान, धार्मिक विधीत स्त्रीची भूमिका 'मम' म्हणण्याची, व्रते, स्त्रियांचीच त्यांचे मूळ कृषिप्रधान व्यवस्थेत, वैदिक आर्याचे पुरुषप्रधान विश्न, कृषिव्यवसाय स्वीकारला पण त्याला प्रतिष्ठा दिली नाही, टोळ्यांच्या संकराचा इतिहास : संस्कृती संगमाचा इतिहास, कुत्रे नव्हे माणसेच : टॉटेमिक समाज, वर्गीय समाजाची घडण, प्रतिलोम विवाह : शूद्र जातीत गणना, कौटिलीय अर्थशास्त्र आणि स्त्रीचे अधिकार, न स्त्री स्वातंत्र्यमर्हति , मानवाच्या कल्पनासृष्टीत त्याच्या अंतःसृष्टीचे प्रतिबिंब, आजची हिंदूसंस्कृती संमिश्र, ऋग्वेदात गौरविलेली अभृणी देवता : एक अपवाद, वैदिक श्रद्धांच्या भूपृष्ठाखालची जमीन, योनिपूजा हीच विश्वजननीची पूजा, देवीपूजा आणि मातृसत्ताक समाज यातील आंतरिक अनुबंध, सिंधूसंस्कृती उत्खननानंतर हाती आलेले दुवे, यातु : महानुभावात्मक आणि समानोत्पत्तिक, पाऊस - . स्त्री - भूमी : सुफलीकरण, कृषियातुविज्ञान : पुरातन परंपरा, कृषिमंत्रात स्त्रीला महत्त्व, वामाचार : मधुरा भक्ती, भारतातील मातृसत्ता, 'माता' पूजनीय पण स्त्री ?, मातेला अधिकार नाहीत, सुफलीकरण विधीत स्त्रीच महत्वाची , कालप्रवाहात स्त्री ओझे व देहस्विनी बनली , सांस्कृतिक एकात्मतेची वाहक आणि चेतक स्त्री, दुर्गापूजा : घट बसवणे, मर्म हरवले औपचारिकता शिल्लक राहिली.


 भारतीय एकात्मतेस लोकपरंपरांचे महत्त्वाचे योगदान -
 भारतातील विविधतेच्या मुळाशी असलेले सांस्कृतिक एकात्मतेचे तत्त्व, लोकपरंपरांतून चालत आलेल्या सांस्कृतिक, भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधि उत्सवांतून, तत्संबंधी गीतांतून प्रतीत होत असते. गेल्या हजारो वर्षांपासून भारतात अनेक टोळ्या आल्या. त्या या भूमीत स्थिरावल्या. संघर्ष, स्वीकार,समन्वय, समरसता या चार सकारात्मक प्रक्रियांतून, सातत्याने

२६८
भूमी आणि स्त्री