संबंधित कथा अगस्तीमुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांच्याशी जोडली आहे. २५अगस्तीमुनी पत्नीसह प्रवास करताना सद्युम्न राजाजवळ आले. तो ध्यानमग्न असल्याने, मुनी आल्याची दखल त्याने घेतली नाही. मुनी रागावले व उन्मत्त हत्ती होशील असा शाप दिला. त्याने परमेश्वराजवळ करुणा भाकली. नंतर त्याला उःशाप मिळाला. लोपामुद्रा ही शेतीची कला जाणणारी होती. तर अगस्ती ऋषी आळशी होते. तिने त्यांना फावडे हातात देऊन शेतीत कामाला लावले अशी मिथक कथा आहे. अगस्तीमुनींनी विंध्यपर्वतास नमवल्याची अशीच कथा आहे. लोपामुद्रा व अगस्ती वनशंकरी शाकंभरीनिर्मित तिलकवनात येऊन राहिले. तेथे त्यांच्या नावाने तीर्थ आहे. तेथून ते हरिद्रातीर्थाजवळ गेले. या तीर्थातले पाणी स्वतः देवीने झाडांना घालून हा परिसर हिरवा केला अशी श्रद्धा आहे. शाकंभरीने पाताळातून पाणी आणून या तीर्थात टाकले अशी कथा आहे.
फार पूर्वी या परिसरात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी स्वतःच्या शरीरातून भाजीपाला निर्माण करून तिने लोकांना आधार दिला. अशी श्रद्धा आहे. या नवरात्राच्या उद्यापनच्या दिवशी साठ भाज्या करतात. हा कुळाचार आहे.
स्त्रीने जमिनीची मशागत करून पालेभाज्या, कंदमुळे, फळभाज्या यांचा शोध लावून अन्ननिर्मिती केली. शेतीचा शोध तिनेच लावला. भूमीला सुफळ करण्याचे विविध प्रयोग तिने केले. तिच्या व्रतांमध्ये शेण, राख यांना महत्त्व आहे. ज्यांचा उपयोग आज उत्तम खत म्हणून केला जातो. आजची शास्त्रीय भाषा तिला अवगत नसली तरी प्रत्यक्ष प्रयोगांतून तिने काही गोष्टी निश्चित केल्या. शेणाला 'शुभा' असे म्हणतात हे आपण मागेच पाहिले आहे.
स्त्रीच्या यात्वात्मक सृजनसामर्थ्यांशी हे व्रत निगडित आहे.
कानबाई : लोकदेवता खानदेशची -
कानबाई ही खानदेशातील सर्व जातिजमातींत लोकप्रिय असलेली धरणीच्या सुफलनशक्तीशी नाते असलेली लोकदेवता आहे. सुफलन प्रक्रियेशी निगडित लोकदेवतांत कानबाईच्या रोटविधीची माहिती दिली आहे. रानबाई-कानबाईचा वार्षिकोत्सव वैशाख महिन्यांतील अक्षय्य तृतीये नंतरच्या कोणत्याही शुक्रवारी वा मंगळवारी संपन्न होतो. खानदेशातील काही भागात चैत्र किंवा माघ महिन्यात केला
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६२
भूमी आणि स्त्री