वावटळी धावू लागतात, आणि वर्षाऋतूची चाहूल देऊन जातात. ग्रीष्माच्या तलाखीने भूमी भाजली जाते. पण त्यातून तिची उर्वराशक्ती वाढते. आंध्रात ज्येष्ठी पौर्णिमेला शेतकरी नांगराची पूजा करून पेरणीच्या तयारीस सुरुवात करतात.
या लोकोत्सवांमध्ये काही सांस्कृतिक आणि राजकीय संघर्षाच्या खुणाही दिसतात. विष्णुच्या दशावतारांपैकी नृसिंह आणि परशुराम या दोहोंशी अक्षय्यतृतीयेचे नाते आहे. देव आणि दैत्य वा असुर यांच्यातील संघर्ष पुराणकथांतून नेहमीच रंगवला आहे. शंकराने असुरांना वर द्यायचा आणि विष्णुने त्यातून पळवाट काढून दैत्यांचा संहार करयाचा हा कल्पनाबंध अनेक कथांत आढळतो. खरे तर हा संघर्ष दोन प्रवृत्तींतील आहे. सण उत्सवांशी त्यांना जोडून आपण या कथा अमर करतो. उत्सवांचे मूळ नाते भूमीशी, तिच्यातून निर्माण होणाऱ्या धान्यलक्ष्मीशी, तिच्यातील सुफलनशक्ती वाढण्याशी असते.
शाकंभरी : वनशंकरी -
मोहंजोदारो हरप्पा उत्खननात सापडलेल्या शिला - प्रतिमांत एका नग्न स्त्रीची प्रतिमा आहे. तिचे पाय वरच्या बाजूला फताडलेले असून, तिच्या योनीतून झाड उगवलेले आहे. देवी माहात्म्यातील देवीचे हे शील्प असावे असे वाटते. मार्कंड्यपुराणातील देवी उद्गारते 'हे देव हो, जीवनावश्यक अशी वनस्पती सृष्टी माझ्या देहातून, पर्जन्यकाळात निर्माण होईल. तिच्या साहाय्याने या विश्वाचे मी धारण-पोषण करीन, (आत्मदेह, समुद्भव) त्यामुळेच मला शाकंभरी हे नावं प्राप्त होईल. चेरोकी जमातीच्या कल्पनेनुसार पहिल्या स्त्रीने इव्हने वनस्पतींना जन्म दिला. मानवाप्रमाणे वनस्पतींनी जन्म देण्याचे यात्वात्मक सामर्थ्य स्त्रीत असते अशी प्राचीन मानवाची श्रद्धा होती. महाराष्ट्रात मराठवाड्यात शाकंभरीचे नवरात्र अनेक घरांतून मांडले जाते. पौष शुद्ध अष्टमीपासून शाकंभरीचे नवरात्र बसते. पौषी पौर्णिमेपर्यन्त असते. पौर्णिमेस रथोत्सव असतो. सर्व जाति जमातीचे लोक शाकंभरीची पूजा करतात. शाकंभरीचे देऊळ विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ आहे. स्कंदपुराण, देवीभागवत, पदमपुराण यात शाकंभरीचे माहात्म्य रंगविले आहे. देवीच्या मंदिराजवळ १२० एकरांत हिरवेगार सौंदर्य आहे. देवीच्या कृपेने वाहणाऱ्या हरिद्रा तीर्थातून निघालेल्या ओढ्यांमुळे हे 'तिलकवन' रम्य बनले आहे. या स्थानाशी
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२६१