आडाखे बांधतात. महाराष्ट्राप्रमाणे जलकुंभावर टरबूज ठेवून दक्षिणेसह पुरोहिताला दान देतात. या दिवशी पितरांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांच्या नावे पुरोहितास दान दिले जाते. काहींच्या मते हा दिवस पूर्ण मुहूर्ताचा आहे. या दिवशी वा या काळात कृषिसंबंधीचे भविष्य जाणून घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असावी. संचारी अवस्थेत भक्त हे भविष्य गुप्त भाषेत सांगतो. याला २४'हुईक' असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील लोणजे गावी एक प्रथा आहे. फाल्गुन पौर्णिमेस देवीच्या मंदिराशेजारी १२ लहान लहान खड्डे खणतात. १२ प्रकारची धान्ये, रूईच्या पानात ठेवून पान गुंडाळून खड्ड्यात ठेवून, खड्डा बुजवतात. दुसऱ्या दिवशी ज्या धान्याला ओल येईल त्या धान्यास पूरक असा पाऊस पडेल अशी श्रद्धा या परिसरात आहे. अशा तऱ्हेचा कृषिविधी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथेही करतात. रूईच्या पानाऐवजी धान्य छोट्या बोळक्यात ठेवतात.
ऋतुचक्राशी जोडलेले उत्सव -
भारतातील विधी, उत्सव हे ऋतुचक्राशी भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेले आहेत. भारतीय वर्ष गणनेत एकूण सहा ऋतू मानले आहेत. वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म हे ते सहा ऋतू. आषाढ, श्रावण-वर्षा, भाद्रपद, आश्विन-शरद, कार्तिक, मार्गशीर्ष-हेमंत, पौष माघ-शिशिर, फाल्गुन चौत्र- वसंत, वैशाख ज्येष्ठ-ग्रीष्म, सर्वसाधारणपणे या पद्धतीने ऋतूंचा क्रम असतो. हेमंतात पाने पिवळी होऊन गळू लागतात. गव्हाची राने, सोनेरी होतात. शिशिरात पाने गळून झाडे पर्णविहीन होतात. थंडी पराकोटीला पोहोचते, महाशिवरात्रीपासून थंडी झपाट्याने कमी होते. दवाने ओलावलेल्या भूमीला वाढत्या उन्हाचा स्पर्श होताच तिच्यातील ऊर्जा जागते आणि झाडांना कोवळी पालवी फूटू लागते. जुई, मोगरा, शिरीष, बहावा आदी झाडे कळ्यांनी मोहरून जातात. वसंतात सृष्टीला, भूमीला लाभलेले यौवन, सृष्टीच्या मातृत्वाची ग्वाही देते. हा काळ जणु भूमी आणि सूर्य यांच्या समागमाचा. माघ शुद्ध पंचमीस वसंतपंचमी म्हणतात. तर फाल्गुन कृष्णपंचमी रंगपंचमी असते. फाग चैती हे गीतांचे प्रकार उत्तर भारतात रात्र रात्र जागून गायले जातात. वैशाखात उन्हे धारदार होतात. ज्येष्ठात उष्णता पराकोटीला पोहोचते. ज्येष्ठ पौर्णिमेपासून दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या चक्री
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२६५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६०
भूमी आणि स्त्री