ग्रंथात पान क्र.६९ वर २.६ हे चित्र आहे. महेश्वरजवळील नावडा-टोलीजवळ भांड्याचा तुकडा मिळाला त्यावर सुमारे इ.स. पू. १६०० वर्षे रंगवलेले नृत्य करणाऱ्या मुलींचे हे चित्र आहे.
त्यासंदर्भात डॉ. डी. डी. कोसंबी नोंदवतात ..... girls still dance hataga dance as shown here' कुमारी मुलींनी 'भूमीवर (हादगा) नृत्य केल्याने भूमी सुफलित होते, पाऊस येतो या पुरातन श्रद्धा स्त्रियांच्या व्रतांतून आपले अस्तित्व दाखवितात. चैत्रांगणातील नृत्य करणाऱ्या मुलींचे चित्र भारतीय संस्कृतिकोश खंड ३ यात ४६४ पानावर आहे. त्यातील मुलींची हात धरण्याची पद्धत आणि त्या भांड्याच्या तुकड्यावरील नृत्य करणाऱ्या मुलींच्या चित्रात खूप साम्य आहे. जे पाहणाऱ्याला चकित करते. चैत्रात गौरीच्या हळदीकुंकवाच्या वेळी कुमारिकांची पूजा करण्याची पद्धत आजही आहे. संदर्भाचे हे अंधुक दुवे जोडणे हे एक आव्हानच आहे.
गणगौर .... राजस्थानातली -
चैत्रगौर कर्नाटकातही मांडली जाते. महाराष्ट्राप्रमाणे आरास करतात. स्त्रियांची भिजविलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात. राजस्थानात गणगौर सामूहिकपणे साजरी करतात. राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र मास सुरू हतो. या दिवशी म्हणजेच चैत्रकृष्ण प्रतिपदेच्यादिवशी (महाराष्ट्रातील फाल्गुन कृष्ण