शंकराला प्रिय, कुत्रे दत्ताला प्रिय. मानवी संस्कृतीच्या विकास - प्रक्रियेत अनेक लोकदैवतांचे एकत्रीकरण झाले. नवे दैवत त्यातून निर्माण झाले. तरीही उपासनेमागची मूळ भूमिका, विधी, अभिचार यातून व्यक्त होत राहिली.
खंडोबाच्या उपासनेत येळकोट, चांगभले, हेगडे, हाळ, बगाड, कोटंबा आदी अनेक शब्द द्रविड भाषेतील आहे. हा देव दक्षिणेतून महाराष्ट्रात आला असावा असे वाटते. खंडोबाची देवळे उत्तरेत नाहीत. जी थोडी फार आहेत ती पेशवे उत्तरेत गेल्यानंतरची आहेत. शिवाजी महाराज होळकर, पेशेव हे मार्तंडाचे उपासक होते.
येळा आवस : मराठवाड्यात विशेष महत्त्व -
मार्गशीर्ष अमावास्येस इळाआवस किंवा येळाअमावास्या असे म्हणतात. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद, बीड परिसरात ही अमावास्या अत्यन्त श्रद्धेने पाळली जाते. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब या दिवशी दशम्या-धपाटे घेऊन शेतात जाते. तेथे जेवण करतात. अनेक कुटुंबांत स्वयंपाक शेतात जाऊन शिजविण्याची प्रथा आहे. ज्यांच्या घरी शेत नाही अशांना शेतात जेवणाचे आमंत्रण दिले जाते. आमंत्रण...आवतण चुलीला असते. या जेवणात दशम्या, धपाटे पदार्थ असतातच. दूध, किंचित साखर, तुपाचे मोहन घालून दशम्या करतात. ज्वारी वा बाजरीचे पीठ, डाळीचे पीठ, थोडे गव्हाचे पीठ एकत्र करून त्यात लसूण, मीठ, मिरची, पालेभाज्या घालून धपाटे करतात. धपाटे हा प्रकार विशेष करून मराठवाड्यातलाच. धपाटे म्हणजे थालिपीठ नव्हे.
आंबिलीचा मान -
या दिवशी मान आंबिलीचा असतो. थोड्या ज्वारीचे पिठात लसूण, आद्रक, जिरे, मीठ, तिखट घालून शिजवितात. त्यात ताक घालून घुसळतात. ही आंबिल शेतीशी निगडित सर्व विधींमध्ये व सणांमध्ये महत्त्वाची असते. लक्ष्म्यांच्या पंच पक्वान्नात, पोळ्याच्या दिवशी आंबिल असतेच. मात्र इळा आवसेला मान आंबिलीचा असतो.
इळा आवसेला गाडग्याला चुना आणि काव लावून रंगवितात. त्यात ५ सुपाऱ्या, ५ खारका, ५ खोबऱ्याचे तुकडे, ५ हळकुंड घालून मडक्याच्या.... सुगड्याच्या
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
२४१