स्कंदाला दक्षिणेत देवसेना व वल्ली अशा दोन बायका मानल्या आहेत. खंडोबाला म्हाळसा आणि बाणाई या दोन बायका आहेतच."
मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवाने जो अवतार धारण केला तोच मल्हारी म्हणजे खंडोबा होय. अशी कथा 'मल्हारी माहात्म्य' या ग्रंथात आहे. 'येळकोट' च्या व्युत्पत्तीबद्दल रा. चिं. ढेरे लिहितात, "मल्हारीचे सैन्य सात कोटी होते. सात या संख्येला कानडीत 'येळ'म्हणतात. हा देव मूळचा कर्नाटकताला असल्याने त्याच्या सात कोटी सैन्याचा जयजयकार 'येळकोट' या कानडी शब्दाने केला जातो."
खंडोबा ही वीर देवता आहे. घोड्यावर आरुढ होऊन हातात 'खंडा' घेऊन असुरांमागे धावणारा देव महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस रक्षणकर्ता वाटतो. खंडोबाचा 'वार' रविवार आहे. त्याच्या नावाने उधळला जाणारा 'भंडारा' म्हणजे पिवळी धम्मक हळद. मुरळी पिवळे वस्त्र परिधान करून कपाळाला भंडारा लावून विशिष्ट पद्धतीने गिरक्या घेत नाचते. मल्लारीचे मल्हारी होते आणि त्याला 'मार्तंड' ची जोड मिळते. 'हरी आणि विठ्ठल' एकरूप झाले तद्वत 'मल्हारीमार्तंड'एक झाले. आणि मार्तंड हे सूर्याचे नाव असल्याचे भारतीय संस्कृतिकोश - खंड दहा - सूर्योपासना या टिपणात नमूद केले आहे. प्रा. र. रा. गोसावी यांच्या मते ऋग्वेदात आदित्य संघातील आणि सौरसंघातील देवता ऐकमेकांच्या संघात विलीन झाल्याचे दिसून येते. दोनही संघात समान असणारे 'तेज' हे तत्त्व या मागील कारण असावे. कश्यप प्रजापतीची पत्नी अदिती हिच्या आठ पुत्रांपैकी 'मार्तड' हा एक आहे.
मल्हारी : विविध रूपे -
खंडोबाला मल्हारी, मैराळ, मैलार, मार्तंड भैरव, मल्हारी मार्तड, खंडेराय अशी अनेक नावे आहेत. या देवाला वांग्याचे, कांदा लसूण घालून केलेले भरीत, बाजरी वा कणकेचे रोडगे विशेष करून आवडतात, पुरणावरणाचा नैवेद्यही प्रिय आहे. खंडोबाला दवणा आणि भंडारा प्रिय आहे. याच्या चार हातांत खडग, त्रिशूल, डमरु व रक्त गळणाऱ्या मुंडक्यासह पानपत्र अशा चार वस्तू असतात. हे दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रात आले असावे. या दैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी अघोरी उपाय करण्याची प्रथा आहे. ही वीरांची देवता आहे. शेती करणाऱ्यांची,
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३६
भूमी आणि स्त्री