त्यांचा उद्देश या दैवी उपायांनी शेतीभातीची निर्मिती क्षमता कायम राखणे हेच आहे. अर्थात कालौघात हे प्रकार प्रगल्भ झाल्यामुळे त्यांना स्वतंत्र आस्तित्व आले. आपल्याकडच्या लावण्या या मूळ पिकांची वृद्धी होण्यासाठी केलेली अभिचार गीतेच व नृत्येच आहेत यात शंका नाही."
सूर्यपूजा कोणाच्यात? -
पशुपालन, शिकार हे ज्यांचे आदिम व्यवसाय होते त्यांच्यात सूर्योपासना असेल का ? पेरु देशात खूप सूर्य मंदिरे आहेत. रेड इंडियन सूर्योपासक होते. पहिली शिकार सूर्याला अर्पण केली जाई. मोहंजोदडोत स्वस्तिक, चक्र, किरणयुक्त वर्तुळ, डोळा आणि पक्षी ही प्रतीके आढळली. ती वेदांत सूर्याचे प्रतीक मानली आहेत. महाभारतात सूर्यपूजा आहे. युधिष्ठिर सूर्यपूजक होता. प्रा. र. रा. गोसावींच्या मते ग्रीक, शक, कुशाणांच्या स्वाऱ्या वायव्येकडून झाल्या. या काळात सूर्योपासनेला प्रेरणा मिळाली. मात्र वैदिक परंपरांतून चालत आलेल्या मूळ भारतीय सूर्योपासनेवर परकीय संस्कृतीतील सूर्योपासनेचा काही प्रभाव पडला नसेल असे म्हणता येणार नाही. कनिष्काच्या नाण्यावरील सूर्यदेवतेच्या पायांचा गुडघ्यापर्यन्तचा भाग बुटांनी झाकलेला आहे.
यावरून असे लक्षात येते की वैदिकांच्या दैनंदिन उपासनेतील सूर्यपूजा उत्तरोत्तर भारतभर पसरली. सौर संप्रदायही निर्माण झाला. ही सूर्यपूजा लोकपरंपरेने जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांत सहजपणे स्वीकारली. ही देवता अशी आहे की जी वैदिकांच्या नित्यकर्माचा एक भाग होती. परकीय आक्रमणांतून शक, कुशाण, इराण, रोम येथून आलेल्या टोळ्याही सूर्योपासक होत्या. सूर्यपूजा भारतभर रुढ झाली. भारतातील लोकसंस्कृतीनेही तिचा सुरुवातीपासून स्वीकार केला. 'सूर्य' देवतेच्या या वेगळेपणामुळे, लोकदैवतांच्या प्रकरणात या देवतेच्या स्वरूपाची चर्चा न करता, 'सूर्य : भूमी आणि सर्जन ' या प्रकरणात ती विस्तृतपणे केली आहे.
खंडोबाचा षड्रात्रोत्सव : सटीचे नवरात्र -
सटीचे नवरात्र मराठवाड्यातील सर्व जातिजमातींच्या अनेक घरांतून कुळाचार म्हणून पाळले जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यन्त हे नवरात्र बसते. हे
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३४
भूमी आणि स्त्री