Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 यादव काळात सूर्योपासनेचा प्रसार महाराष्ट्रात झाला. सिरिया इजिप्त या देशात सूर्योपासना होती. जपानमध्ये सूर्योपासना होती. मात्र तेथील सूर्य स्त्रीरूपात आहे. बौद्ध धर्म जपानमध्ये स्थिर होण्यापूर्वी तेथे शिंतोधर्म होता. जपानच्या राजघराण्याचे कुलदैवत सवितादेवी होते. अरुणाचल आदिवासींमधील तागीन जनजाती जी अरुणाचलाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात राहते. त्यांच्यातील सर्वात महत्त्वाचा सण सिदोनी (Sidoni). हा उत्सव अलीकडे ठरवून २ ते ५ जानेवारी होतो. येथे दोनी म्हणजे सूर्य. ती आई-माता आहे आणि सी म्हणजे जमीन. सिदोनीला वेगळे व्हायचे होते. निसर्गाने त्यासाठी १० दिवसांचे व्रत सांगितले. निसर्गाची प्रार्थना सांगितली. लबाड 'तपेन' वटवाघळ याने दोनीला व्रत मोडायला लावले आणि त्यामुळे दोनीला निदोचे - आभाळाचे रूप प्राप्त झाले. या जमातीत 'न्योकुम' ही धरतीची पूजा केली जाते. या सणात सात वनस्पतींची पूजा केली जाते. पोलो म्हणजे चंद्र. तो पुरुष पिता असतो. तर दोनी - सूर्य ही आई. भारतातील ईशान्येकडील जनजातींची ठेवण ही खूपशी म्यानमार-ब्रह्मी लोकांसारखी आहे. त्या पलीकडे गेले की चीन, जपान दोन्ही देशांत बौद्धधर्म स्थिरावला आहे.
 या ठिकाणी इ.स. ६०० ते ६४० या दरम्यान होऊन गेलेल्या कनोजच्या हर्षवर्धनाची आठवण येते. तो बौद्ध होता. तरीही गौरी, महेश्वर आणि सूर्य यांची उपसना करीत असे. अरुणाचलातील या जनजाती हिंदू नाहीत वा ख्रिश्चन नाहीत. परंतु त्यांची पूजा पद्धती भारतीय संस्कृतीशी मिळती आहे. धरतीच्या पूजेचे वेळी मिथुन प्राणी मारतात. ती मादी असेल तर तिचे दूध काढीत नाहीत. बळीसाठी मादी चालते.
 आपल्याकडची लावणी पीक वृद्धीसाठी -
 एकूण असे लक्षात येते की प्राथमिक कृषि व्यवस्थेच्या काळातील व्रते, विधी हे धरती आणि वृष्टी यांच्याशी निगडित होते. शेतीचा जसजसा विकास होऊ लागला, बीजाचे महत्त्व लक्षात आले. त्यानंतर व्रतांमध्ये सण... उत्सवामध्ये 'सूर्य' या देवतेला विशेष स्थान मिळाले. व्रतांमधील सामूहिकता, नृत्यात्मकता कमी होत गेली. या ठिकाणी दुर्गा भागवतांचे विधान आठवते' आसमामधील नागानृत्ये, दक्षिणेतील यक्षगान ही शिवपार्वती वा प्रकृतीपुरुषाच्या लीलांची रूपकात्मक अनुकरणे असून

भूमी आणि स्त्री
२३३